IPS Officer । ‘संत मीराबाईप्रमाणे कृष्णभक्तीत तल्लीन व्हायचंय’, स्वेच्छानिवृत्तीसाठी महिला IPS अधिकाऱ्याचे DGP ला पत्र

हरियाणा : वृत्तसंस्था – हरयाणा कॅडरच्या 50 वर्षीय आयपीएस अधिकारी भारती अरोरा (IPS officer Bharti Arora) यांनी एक मोठी मागणी केली आहे. भगवान श्रीकृष्णाची परमभक्त संत मीराबाईप्रमाणे आपल्याला देखील कृष्णभक्तीत तल्लीन व्हायचंय, म्हणून मला स्वेच्छानिवृत्ती द्यावी, याबाबत मोठी मागणी महिला IPS Officer भारती अरोरा यांनी केली आहे.

IPS अधिकारी भारती अरोरा (IPS officer Bharti Arora) या 2031 मध्ये निवृत्त होणार आहेत. परंतु, त्यांना दहा वर्ष अगोदरच स्वेच्छानिवृत्ती हवी आहे. यासाठी त्यांनी 24 जुलैला पोलीस महासंचालक (DGP) यांना याबाबत पत्र देखील पाठवलं आहे. त्यावेळी भारती अरोरा यांनी त्या पत्रात असं म्हटलं आहे की, ‘पोलिसात असताना देशसेवा करणे माझ्यासाठी गर्वाचा क्षण होता असा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. याचबरोबर पुढील आयुष्य चैतन्य महाप्रभू, कबीरदास आणि मीराबीई यांच्याप्रमाणे कृष्णभक्तीत आणि धार्मिक कार्यात व्यतित करण्याची आपली इच्छा असल्याच देखील त्यांनी म्हटलं आहे. तसेच, 3 महिन्यांचा नोटिस पीरियडही आपण पूर्ण करू इच्छित नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

या दरम्यान, IPS अधिकारी भारती अरोरा यांच्या मागणीवर अजून निर्णय झालेला नाही.
वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या संपर्कात असून मन वळवण्यासाठी ते प्रयत्न करत असल्याचे समजते.
दरम्यान, नवी दिल्लीहून अटारीला जाणाऱ्या समझोता एक्सप्रेसमध्ये (18 फेब्रुवारी, 2007) रोजी बॉम्बस्फोट झाला होता.
या प्रकरणी तपासामध्ये हरयाणा कॅडरच्या IPS अधिकारी भारती अरोरा (IPS officer Bharti Arora) यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
त्यावेळी त्या हरयाणा रेल्वे पोलीसमध्ये पोलीस अधीक्षक (SP) पदावर कार्यरत होत्या.

Web Title :- IPS Officer | haryana ips officer bharti arora seeks premature retirement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 221 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | खळबळजनक ! हॉटेल ‘गारवा’चे मालक रामदास आखाडेंच्या खून प्रकरणी 19 वर्षीय तरूणीस अटक, गुन्हयातील ‘रोल’ निष्पन्न

Pune Crime Branch Police | कोकेन बाळगणाऱ्या नायजेरियनला अटक, 4 लाखाचे कोकेन जप्त