काय सांगता ! होय, निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी चक्क फरशीवर झोपले ‘हे’ IPS अधिकारी

पोलिसनामा ऑनलाइन – १९८५ सालच्या बॅचचे असेलेले केरळमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी जॅकब थॉमस आपल्या नोकरीच्या शेवटच्या दिवशी ऑफिसमधील फरशीवर झोपल्याचं दिसून आले. त्यांचा याबाबतचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे

आयपीएस अधिकारी असणारे जॅकब थॉमस यांनी स्वतः यासंबंधीचा फोटो सोशल मीडियात शेअर करत म्हटलं की, नोकरीच्या शेवटच्या दिवशी ऑफिसमधील रूममध्ये झोपलो. तसेच त्यांचा, हातात कुऱ्हाड असलेला दुसरा फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे मीडियात अशी चर्चा रंगली आहे की, जॅकब थॉमस आपल्या जीवनात नवीन कामाची सुरुवात करतील.

दरम्यान, जॅकब थॉमस यांनी २०१९ लोकसभा निवडणुकीत सेवानिवृत्ती घेऊन निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला होता. पण राज्य सरकारने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. आपल्या ३५ वर्षाच्या कार्यकाळात जॅकब थॉमस जास्त साइडलाइनलाच राहिले. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात फक्त ४ ते ५ वर्षे खाकी वर्दी घालून त्यांनी काम केलं. मात्र, नंतर बहुतेक वेळा ते विविध संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांवरती प्रशासकीय अधिकारी म्हणूनच राहिले.

जॅकब हे रविवारी धातू उद्योगाचे व्यवस्थापक संचालक म्हणून निवृत्त झाले. ते सुरुवातीपासूनच वाद-विवाद यामुळे चर्चेत राहिले. त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप देखील झाले होते. कोडागुमधील वनजमिनीचे अतिक्रमण यासोबत अनेक भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. सध्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दक्षता संचालक म्हणून जॅकब थॉमस यांची नेमणूक केली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like