‘कोरोना’पासून बचावासाठी बँकेच्या कॅशिअरनं शोधला ‘उपाय’, पाहून IPS अधिकारी झाले ‘भक्त’, ठोकला ‘सॅल्यूट’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : देशभरात कोरोना व्हायरसची वाढती प्रकरणे लक्षात घेता 21 दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. जो 14 एप्रिलपर्यंत चालू राहील. लॉकडाऊन दरम्यान लोकांना घर सोडू नये, असे आवाहन केंद्रासह राज्य सरकारांनी केले आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवांना यातून सूट देण्यात आली आहे. या सेवांमध्ये बँक देखील समाविष्ट आहे. अत्यावश्यक सेवांशी संबंधित लोक विविध प्रकारे सावधगिरी बाळगत आहेत, ज्यात सॅनिटायझर वापरणे, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून स्वत: चे रक्षण करण्यासाठी मास्क घालणे यांचा समावेश आहे. या दरम्यान, भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी पंकज नैन यांनी बॅंक कर्मचार्‍याने कोरोना व्हायरसपासून बचावासाठी काढलेल्या अनोख्या तोडग्याचा व्हिडिओ शेअर करताना त्यांचे अभिनंदन केले आहे.

आयपीएस अधिकारी पंकज नैन यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात एक महिला खिडकीच्या बाहेर व्हाउचरसह उभी असल्याचे दिसून येत आहे. एक बँक कर्मचारी महिलेला व्हाउचरसाठी विचारतो आणि ते घेऊन कॅशियरच्या डेस्कवर ठेवतो. बँकेच्या कॅशीयरने सुरक्षात्मक उपायांचा अवलंब करत, हातात हातमोजे घातले आहेत. तो चिमटासह व्हाउचर उचलतो आणि त्याशेजारी ठेवलेली इस्त्री त्यावर फिरवतो. बँक कर्मचाऱ्याचा हा तोडगा पाहून आयपीएस अधिकारी पंकज नैनही त्यांचे चाहते झाले आहेत. त्यांनी लिहिलं कि – या बँके कॅशीयरच्या या क्रिएटिव्हिटीला सलाम … सर्व व्हायरस ठार. ”

दरम्यान, रविवारी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची संख्या 3,374 पर्यंत वाढली आहे, तर या विषाणूमुळे आतापर्यंत 77 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 9 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 472 नवीन घटना नोंदविल्या गेल्या आहेत. दरम्यान, याबद्दल काहीसा दिलासा मिळाला आहे की एकूण 267 लोक त्याच्या संसर्गामुळे बरे झाले आहेत.