आयपीएस अधिकारी राजेश प्रधान, एम.बी. तांबडे आणि जय जाधव यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पदोन्नती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने पोलिस उप महानिरीक्षक दर्जाच्या 3 अधिकार्‍यांना विशेष पोलिस महानिरीक्षक पदी बढती दिली आहे. पदोन्नती मिळालेल्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कंसात त्यांच्या नेमणुकीबाबत पुढील प्रमाणे.

1. राजेश प्रधान (विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना), महाराष्ट्र राज्य, मुंबई (तदर्थ) ते विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना), महाराष्ट्र राज्य, मुंबई)

2. महादेव बी. तांबडे (पोलिस उप महानिरीक्षक व संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी, पुणे ते विशेष पोलिस महानिरीक्षक व संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी, पुणे -संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी, पुणे हे पद श्रेणी उन्नत करून)

3. जय वसंतराव जाधव (पोलिस उप महानिरीक्षक व सह पोलिस आयुक्त, नवी मुंबई ते सह पोलिस आयुक्त, नवी मुंबई – सह आयुक्त, नवी मुंबई हे पद श्रेणी उन्नत करून)