IPS Rashmi Shukla | रश्मी शुक्लांची महाराष्ट्रात महत्त्वाच्या पदावर होणार नियुक्ती?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) क्लीन चिट मिळाल्यानंतर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) या पुन्हा महाराष्ट्रात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांना महाराष्ट्रात फक्त परत आणले जाणार नाहीतर त्यांची महत्त्वाच्या पदावर वर्णी लागणार आहे, अशी जोरदार चर्चा आहे. या संभाव्य निर्णयाबद्दल राज्यातील पोलीस (Maharashtra Police) आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळातही चर्चा सुरू आहे.

 

पुणे पोलिसांनी (Pune Police) रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्यावरील फोन टॅपिंग प्रकरणात क्लोजर रिपोर्ट (Closure Report) न्यायालयात सादर केला होता. न्यायालयाने हा क्लोजर रिपोर्ट स्वीकारल्यानंतर संबंधित प्रकरणाचा तपास पूर्णपणे बंद होतो. काही दिवसांपूर्वीच रश्मी शुक्ला यांनी मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यासोबत सागर बंगल्यावर जाऊन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्रात येणार याबाबत चर्चा सुरू झाली होती.

 

2019 मध्ये विधानसभेच्या निकालानंतर राज्यात झालेल्या राजकीय नाट्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) आले. शिवसेनेने भाजप सोबतची युती (Shivsena – BJP Alliance) तोडून राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) सोबत महाविकास आघाडी करून सरकार स्थापन केले. याच काळात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी त्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप होता. गुप्तवार्ता विभागाने (Intelligence Department) रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून टॅप केले होते. ज्या नेत्यांचे फोन टॅप करायचे आहेत. त्यांची बनावट नावे सांगून, फोन टॅप करण्यात आले होते. यामुळे रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली होती.

आरोप झाल्यानंतर रश्मी शुक्ला केंद्रीय प्रतिनियुक्तीवर गेल्या.
मात्र, तत्कालीन सरकारने फोन टॅपिंग प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी हे प्रकण मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) सायबर सेलकडे (Cyber Cell) सोपवले.
या सगळ्या चौकशीत शुक्ला यांनी अपेक्षित सहकार्य केले नाही.
त्या चौकशीसाठी मुंबईत येण्यात तयार नव्हत्या. याच दरम्यान त्यांना अटक होणार अशी चर्चा होती.
मात्र, आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात क्लिन चिट देण्यात आली.
एवढेच नाही तर केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

 

Web Title :- IPS Officer Rashmi Shukla | ips officer rashmi shukla may return to maharashtra get key posting

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | भांडणे करु नको, असे सांगितल्याने मित्रानेच कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ परिसरातील घटना

Shivsena | उद्धव ठाकरे यांच्यासमोर ‘या’ तीन चिन्हांचा पर्याय, निवडणूक आयोगाकडे दावा करणार

NCP Chief Sharad Pawar | मागील काही दिवस वाचत होतो, ते घडलं, पण…, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया