IPS Officer Rashmi Shukla | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदी पदोन्नती

दिल्ली : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांना बढती (Promotion) मिळाली आहे. रश्मी शुक्ला यांच्यासह अतुलचंद्र कुलकर्णी (Atulchandra Kulkarni), सदानंद दाते (Sadanand Date) यांच्यासह 20 आयपीएस अधिकाऱ्यांना बढती (IPS Officer Rashmi Shukla) मिळणार आहे. शनिवारी (दि.11) दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. रश्मी शुक्ला या 1988 च्या आयपीएस अधिकारी आहेत.

 

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांना पोलीस महासंचालक (Director General of Police) पदी पदोन्नती देण्यात आली आहे. कॅबिनेट नियुक्त समितीने Cabinet Appointed Committee (एसीसी) सन 1988 व 1999 बॅचच्या देशभरातील 20 अधिकाऱ्यांना बढती दिली आहे. यामध्ये रश्मी शुक्ला, अतुलचंद्र कुलकर्णी, सदानंद दाते यांना महासंचालकपदी बढती मिळाली आहे.

 

सदानंद दाते हे मुंबईतील कायदा व सुव्यस्था (Mumbai Law and Order) तसेच गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त (Crime Branch Joint CP) होते. 26/11 च्या (26/11 Attack) मुंबई दहशतवादी हल्ल्यात (Mumbai Terror Attack) दाखवलेल्या शौर्याबद्दल दाते यांचा गौरवही करण्यात आला. ते तीन वर्षे केंद्र राखीव पोलीस (Central Reserve Police) दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकही (Addl DGP) होते. मिरा-भाईंदर पोलीस आयुक्त (Mira-Bhayander CP) म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सध्या ते महाराष्ट्र दहशतवाद विरोधी (Maharashtra ATS) पथकाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

अतुलचंद्र कुलकर्णी हे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेत (NIA) कार्यरत आहेत.
त्यांनी इंटेलिजेंस ब्युरोमध्ये (IB) काम केले आहे.
मुंबई गुन्हे शाखेत (Mumbai Crime Branch) ते कार्यरत होते.
ते महाराष्ट्र एटीएस व सीआयडी (CID) प्रमुखही होते.

 

रश्मी शुक्ला ह्या मार्च 2016 ते जुलै 2018 या कालावधीत
पुणे पोलीस आयुक्त (Pune CP) होत्या. सध्या त्या हैदराबाद येथे कार्यरत आहेत.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून काम करीत आहेत.

 

Web Title :- IPS Officer Rashmi Shukla | IPS Rashmi Shukla Promoted As A DG In Govt Of India

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | स्वत:च्या घरात जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या सुनेसह चार जणांना कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

National Lok Adalat | पुणे जिल्हा सलग नवव्यांदा दावे निकाली काढण्यात राज्यात प्रथम

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘शिवाजी महाराजांचा अपमान करणारं…’, उद्धव ठाकरेंचा भगतसिंह कोश्यारींना खोचक टोला