IPS Officer Rashmi Shukla | फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात खटला चालविण्यास राज्य सरकारचा नकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अवैध फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) मागील दोन वर्षे चर्चेत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut), काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे फोन टॅप केल्याचे त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. याप्रकरणी राज्य सरकारकडून त्यांना दिलासा मिळाला आहे. रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांच्या विरोधात खटला चालविण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे.

 

या फोन टॅपिंग प्रकरणात खटला चालविण्यासाठी मागितलेली परवानगी गृहखात्याने नाकारली आहे. संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन टॅप झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) प्रकाशझोतात आल्या होत्या. परंतु गृहविभागाने (Home Affairs) त्यांच्या विरोधात खटला चालविण्यास मागितलेली परवानगी फेटाळल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही काळात शुक्ला यांनी नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटी घेतल्या होत्या.

 

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla)
यांच्या विरोधात फोन टॅप केल्याप्रकरणी कुलाबा पोलीस स्थानकात (Colaba Police Station, Mumbai) गुन्हा दाखल झाला होता.
संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यांच्यावर त्यासंदर्भात आरोपपत्र (Charge Sheet) देखील दाखल करण्यात आले होते.
नियमानुसार कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याच्या विरोधात खटला चालविण्यासाठी केंद्रीय किंवा राज्याच्या गृहखात्याची परवानगी आवश्यक असते.
आता या प्रकरणाला गृह विभागाने लाल दिवा दाखवत परवानगी नाकारली आहे. त्यामुळे पोलीस हा सर्व अहवाल न्यायालात पाठवणार आहेत.
त्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावरील खटला मागे घेण्यात येणार आहे.

या प्रकरणातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे, रश्मी शुक्ला यांनी कोणत्याही परवानगीशिवाय फोन टॅपिंग केले असल्याचे मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) पुरावे होते.
तरी देखील ही केस बंद झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या प्रकरणाचे पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- IPS Officer Rashmi Shukla | ips rashmi shukla relief from phone tapping case eknath khadase and sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Deshmukh | शिवसेनेत प्रवेश करताच संजय देशमुखांनी केली मोठी घोषणा, म्हणाले- ‘आगामी काळात…’

Dhananjay Munde | पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? धनंजय मुंडेंनी दिले मार्मिक उत्तर

British PM Liz Truss | ब्रिटनमध्ये राजकीय भूकंप, पंतप्रधान लिझ ट्रस यांचा तडकाफडकी राजीनामा