×
Homeताज्या बातम्याIPS Officer Rashmi Shukla | फोन टॅपिंग प्रकरणात दिलासा, आता रश्मी शुक्लांना...

IPS Officer Rashmi Shukla | फोन टॅपिंग प्रकरणात दिलासा, आता रश्मी शुक्लांना मिळणार हे मोठं ‘गिफ्ट’?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंगचा (Phone Tapping Case) आरोप असलेल्या पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त (Pune Former CP) रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांना नुकतीच क्लिन चीट मिळाली आहे. राष्ट्रवादीचे नेते (NCP) एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांच्यावर करण्यात आल्याने त्या अडचणीत आल्या होत्या. आता पुढील आठवड्याच्या सुरुवातीला त्यांना महासंचालक (Director General of Police) म्हणून नियुक्त केलं जाण्याची शक्यता आहे, अशी राजकीय आणि पोलिस वर्तुळात चर्चा आहे.

रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्या सध्या हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक (Addl DG SRPF) म्हणून नियुक्त आहेत. IPS हेमंत नगराळे (IPS Hemant Nagarle) यांच्यानंतर त्या राज्यातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. त्या राज्याचे डीजीपी आयपीएस (DGP) अधिकारी रजनीश शेठ (IPS Rajnish Sheth) यांच्या वरिष्ठ आहेत. रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) या जून 2024 मध्ये निवृत्त होणार आहेत.

राज्य सरकारने दिलासा दिल्यानंतर त्यांनी केंद्रात पोलीस महासंचालकपदी पात्र ठराव्यात यासाठी प्रयत्न सुरु केले
आहेत अशी चर्चा आहे. केंद्रात पोलीस महासंचालकपदाकरिता पात्र ठरल्यावर त्यांचा राज्याच्या सेवेत पोलीस महासंचालकपदी येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात
शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्या महासंचालक पदावर पात्र ठरल्या नव्हत्या.

रश्मी शुक्ला यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त (Mumbai CP) किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या
महासंचालकपदी (ACB DG) नियुक्ती करण्यात येऊ शकते, अशी राजकीय आणि पोलिस वर्तुळात चर्चा आहे.

Web Title :-  IPS Officer Rashmi Shukla | rashmi shukla soon be maharashtra dgp or mumbai cp in the state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | वृत्तपत्रात बदनामी करण्याची धमकी देऊन 5 लाखांची खंडणी वसुल करणार्‍या
चौघा तोतया पत्रकारांना अटक, महिला संपादकासह 6 जणांवर FIR

Hindustan Unilever (HUL) | ‘हे’ शॅम्पू वापरणे ताबडतोब बंद करा, कॅन्सरचा धोका असल्याने कंपन्याने उत्पादने घेतली मागे

Must Read
Related News