‘या’ आयपीएस (IPS) अधिकाऱ्याने दिला राजीनामा

बेंगळुरू : वृत्तसंस्था – आयपीएस व्हावं असं आज देशातील लाखो तरुण-तरूणींचं स्वप्न असतं. पण प्रत्येकालाच नशीबाची साथ मिळतेच असं अजिबात नाही. त्याचप्रमाणे त्या पदावर गेल्यावर सर्वानाच तिथे करमते असे नाही. त्यामुळे ते लवकरच सेवेतून निवृत्त होतात. अशीच एक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. या तरुण आयपीएस अधिकाऱ्याने आपली उत्तम पगाराची आणि सोयीसुविधांची नोकरी सोडून दिली आहे. भारतीय पोलीस सेवेतील कर्नाटकमधील अधिकारी के. अन्नामलाई असे त्याचे नाव आहे. बंगळुरु साऊथ डिव्हिजनच्या पोलीस उपायुक्त या पदावर तो कार्यरत होता.

आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्याने फेसबुकवर एक पोस्ट शेयर केली आहे. यात त्याने आपल्या नोकरी सोडण्याचे आणि भविष्यातील जीवन कसे व्यथित करणार आहे हे सांगितले आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, मला फक्त काही वेळ आता माझ्या स्वत:साठी हवा आहे. कारण मला आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींची मजा घ्यायची आहे. ज्या मला आठवत आहेत. मला माझ्या मुलासाठी वेळ काढायचा आहे. कारण की, आता तो झपाट्याने मोठा होत आहे. मी आता माझ्या गावी जाऊन पुन्हा शेती करू इच्छितो.’ पोस्टमध्ये पुढे तो लिहितो की,’त्या शेतातील मातीचा सुगंध मला पुन्हा एकदा घ्यायचा आहे. जिथे मी लहानाचा मोठा झालो. तिथे जाऊन मला पाहायचं आहे की, काय आता आमची शेतातील जनावरं माझ्या गोष्टी ऐकतील ? कारण, आता मी पोलिसवाला राहिलेलो नाही.’ असंही या पोस्टमध्ये हा आयपीएस अधिकारी म्हणतो.

दरम्यान, त्याने आपल्या नोकरीचा राजीनामा जरी दिला असेल तरी त्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी काही वेळ जाणार आहे. ज्यांना माझ्याबद्दल काळजी वाट आहे त्यांचा मी आभारी आहे. मात्र आता मला माझे आयुष्य आनंदात व्यथित करायचे आहे. के. अन्नामलाई याने २०११ मध्ये भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला होता.