‘या’ लेडी IPS अधिकाऱ्यानं केलंय बॉलिवूडमध्ये काम !

पोलीसनामा ऑनलाइन –  मध्य प्रदेशात सोमवारी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यावेळी त्यातील एक नाव खूप जास्त चर्चेत राहिलं. हे नाव आहे आयपीएस सिमाला प्रसाद. सिमाला प्रसाद यांची पोलीस विभागात त्यांनी केलेल्या कामामुळं तर होतंच असते. परंतु त्यांचं बॉलिवूड कनेक्शनही त्यांची वेगळी पर्सनॅलिटी दाखवतं.

https://www.instagram.com/p/CBs9fUqF9Op/

सिमाला प्रसाद 2011 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. याआधी त्या एमपी पीएससी मध्ये सिलेक्ट झाल्या आणि डीएसपी बनल्या. परंतु त्यांना काही वेगळं आणि हटके करण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी सिव्हील सर्व्हीसेसची तयारी सुरू केली आणि 2011 च्या बॅचमध्ये त्या आयपीएस अधिकारी बनल्या.

आयएएस अधिकारी आणि खासदार डॉ भागीरथ प्रसाद आणि साहित्यिक मेहरून्निसा परवेज यांची मुलगी सिमाला यांना प्रशासकीय अनुभव आणि अभिनय कला वारशातच मिळाल्या आहेत ज्याची छाप त्यांच्या जीवनावरही पडली आहे. शाळेत डान्स आणि अ‍ॅक्टींगमध्ये भाग घेता घेता त्या कधी सिव्हील सर्व्हीसेसमध्ये गेल्या हे कळालसुद्धा नाही.

पहिल्या परीक्षेतच सिमाला पीएससी मध्ये सिलेक्ट झाल्या. त्यांची पहिली पोस्टींग डीएसपी म्हणून झाली. सर्वात आधी त्या रतलामच्या डीएसपी बनल्या. पण तरीही त्या अखिल भारतीय प्रशासकीय सेवांच्या तयारी करीतच होत्या. 2011 साली त्यांची आयपीएस म्हणून निवड झाली.

आयपीएस झाल्यानंतरही त्यांच्यात एक कलाकार जिवंत होता. म्हणूनच त्यांनी डायरेक्टर जॅगम इमाम यांच्या अलिफ या सिनेमात रोल केला. हा सिनेमा 2016 मध्ये ऑस्ट्रेलियात इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल ऑफ क्वीसलँडमध्ये वर्ल्ड प्रीमीयर म्हणून प्रदर्शित झाला होता आणि 2017 साली हा सिनेमा रिलीज झाला होता.