IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, सुसाईड नोटही सापडली

लखनौ : वृत्तसंस्था

 

कानपूर शहराचे पोलीस अधीक्षक सुरेंद्र कुमार दास यांनी विषारी पदार्थ खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर कानपूर येथील रिजन्सी रुग्णालायात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दास यांच्या शरिरात विषारी पदार्थाचे अंश सापडले असल्याचा दुजोरा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिला आहे. या घटनेनंतर पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनात खळबळ माजली आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bfeaa0e0-b0ee-11e8-a6f4-c10298a04c4f’]

पोलिस अधीक्षक सुरेंद्र दास यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. पुढील काही तास महत्त्वाचे आहे. आज दुपारी  4 वाजता पुन्हा मेडिकल बुलेटिन जारी केलं जाईल, असं रिजन्सी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितलं. सुरेंद्र कुमार यांच्याकडून सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे. कौटुंबिक तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं समजतं. परंतु या संबंधात ठोस माहिती मिळालेली नाही. शिवाय कोणत्याही अधिकाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे.

गणेश मंडळांना बॉक्स कमानी उभारण्यास परवानगी 

2014 बॅचचे आयपीएस अधिकारी सुरेंद्र कुमार दास हे बलियामधील रहिवासी आहेत.सुरेंद्र दास कानपूरमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहते होते. मागील महिन्यातच त्यांची कानपूरमध्ये बदली झाली होती. इथे ते पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. तर त्यांची पत्नी डॉक्टर असून त्या कानपूर वैद्यकीय कॉलेजमध्ये काम करतात.