IPS Officers Transfer | 11 अधिकार्‍यांच्या बढत्यासह सुमारे 50 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या होणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) राज्यातील सत्ताधाऱ्यांशी संबंधित असलेल्या प्रकरणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच पोलीस वर्तुळामध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या रखडलेली पदोन्नती (promotion) आणि बदली (IPS Officers Transfer) याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. राज्यातील 11 बढत्यांसह जवळपास 50 आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यां (IPS Officers Transfer) कधी होणार याकडे लक्ष लागले आहे. पोलीस उपायुक्त (Deputy Commissioner of Police) ते विशेष महानिरीक्षक (Special Inspector General) दर्जापर्यंतचे हे अधिकारी आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

या अधिकाऱ्यांची होणार बदली

राज्यात कोरोनाचे संकट उद्भवल्याने सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या 30 जून पर्यंत बदल्या स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र आता एका पदावर किमान दोन वर्षे पूर्ण केलेल्या राज्य पोलीस (Maharashtra Police) दलातील 11 अतिरिक्त महासंचालकांच्या (Additional Director General of Police) तर 8 विशेष महानिरीक्षक (Special Inspector General of Police), 7 डीसीपी-डीआयजी (DCP-DIG) आणि 34 उपायुक्त-अधीक्षकांची (Deputy Commissioner-Superintendent) बदली केली जाणार आहे. यामध्ये अपवाद वगळता इतरांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. तर काही जणांना पदोन्नतीसाठी बदली केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

जुलै मध्यापर्यंत आदेश जारी होणार

अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्या करण्यासंदर्भात आठवड्याभरात बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. यासंदर्भातील प्राथमिक कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या मध्यांपर्यंत या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात येतील, असे गृह विभागातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

या अधिकाऱ्यांना मिळणार बढती

आयजी प्रवीण साळुंखे (IG Praveen Salunkhe), निकेत कौशिक (Niket Kaushik), मधुकर पांडये (Madhukar Pandaye), निखिल गुप्ता (Nikhil Gupta), ब्रिजेश सिंह (Brijesh Singh), चिरंजीव प्रसाद (Chiranjeev Prasad) आणि रवींद्र सिंगल (Ravindra Singal) यांना एडीजी (ADG) म्हणून पदोन्नती मिळणार आहे. तर सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Solapur Police Commissioner Ankush Shinde) यांची आयजी (IG) पदावर बढती मिळणार आहे. उपायुक्त राजीव जैन (Deputy Commissioner Rajiv Jain), इशू सिंधू (Ishu Sindhu) व अभिषेक त्रिमुखे (Abhishek Trimukhe) यांचे डीआयजी (DIG) म्हणून बढती होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : IPS Officers Transfer | transfers of 50 ips officers and eleven promotions soon

 

हे देखील वाचा

Woman Care | ‘हे’ ६ पौष्टिक घटक महिलांना अनेक आजारांपासून रक्षण देतात, जाणून घ्या

Menopause | रजोनिवृत्तीत (मेनोपॉज) काय खावे आणि काय टाळावे ‘हे’ जाणून घ्या

Cesarean Delivery | ‘सिझेरियन’नंतर महिलांचा आहार कोणता असावा? जाणून घ्या काय खावे आणि काय नाही