‘अकार्यक्षम’ IPS अधिकाऱ्यांवर गृह मंत्रालयाचा ‘वाॅच’ ; नाहीतर अधिकाऱ्यांना द्यावा लागेल राजीनामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या गेल्या तीन वर्षांच्या काळातील कामाची समीक्षा गृह मंत्रालयाकडून केली जात आहे. यातील रिझल्ट न देणारे जवळपास १२०० अकार्यक्षम ठरलेले IPS अधिकारी गृह मंत्रालयाच्या रडारवर आहेत. तर समीक्षा अजून सुरु असून रिझल्ट न देणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

– ऑल इंडीया सर्विसे अ‍ॅक्टमध्ये तरतूद

ऑल इंडीया सर्विसेस कायद्यातील नियमानुसार सरकारला अधिकाऱ्यांच्या कामाची समीक्षा करणयाचा अधिकाऱ आहे. राज्य सरकारांशी चर्चा करून केंद्र सरकार एखाद्या अधिकाऱ्याला जनहिताचा हवाला देत राजीनामा देण्यास सांगितलं जाण्याची शक्यता आहे. तीन महिन्यांचा पगार देऊन किंवा ३ महिने आधी नोटीस देऊन त्याला घरी बसण्यास सांगितलं जाऊ शकतं. यानुसार देशातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या कामाची समीक्षा करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या २०१६ ते २०१८ या तीन वर्षांच्या काळातील कामाची समीक्षा गृह मंत्रालयाकडून सुरु आहे.

– १० जणांच्या राजीनाम्यासाठी शिफारस ?

देशात सध्या ४ हजार ९४० आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदांची मान्यता आहे. तर सध्या ३ हजार ९७२ अधिकाऱी कार्यरत आहेत. त्यापैकी ११८१ आयपीएस अधिकाऱ्यांची समीक्षा करण्यात येत आहे. त्यात १० अकार्यक्षम अधिकाऱ्यांचा राजीनामा घेण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. असं एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एका इंग्रजी दैनिकाला सांगितले.

– २०१४ ते २०१५ या काळातील समीक्षा नाही

मोदी सरकारने अधिकाऱ्यांच्या सेवेची समीक्षा कऱण्यास सुरुवात केली असल्याची वृत्तं आहेत. दरम्यान यापुर्वी २०१४ ते २०१५ या काळात अधिकाऱ्यांच्या कामकाजाची समीक्षा करण्यात आलेली नाही. परंतु २०१६ ते २०१८ या कालावधीत समीक्षा करण्यात येत आहे. या समीक्षेतून कार्यक्षम आणि अकार्यक्षम अशी अधिकाऱ्यांची ओळख केली जाणार आहे. यात अकार्यक्षम ठरणाऱ्या अधिकाऱ्यांना सुधारणा करा अन्य़था राजीनामा द्या असे सांगितले जाऊ शकते.

तर २०१५ ते २०१८ या काळातील कामकाजाची समीक्षा केल्यानंतर ४ अधिकाऱ्यांना जनहित लक्षात घेऊन राजीनामा देण्यास सांगितले आहे.