IPS Rashmi Shukla | फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस रश्मी शुक्लांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – IPS Rashmi Shukla | फोन टॅपिंग प्रकरणात (illegal Phone Tapping Case ) आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्यावर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला आहे. फोन टॅपिंग प्रकरणात अटक होण्याची शक्यता असल्याने रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपल्यावर दाखल एफआयआर (FIR) रद्द व्हावा अशी मागणी त्यांनी याचिकेतून केली. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) रश्मी शुक्ला यांना कोणताही दिलासा दिला नाही. शुक्ला यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

 

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बेकायदेशीर फोन टॅपिंग (illegal Phone tapping) आणि त्याबबतचा गोपनीय अहवाल लिक प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अटक होण्याच्या शक्यतेमुळे रश्मी शुल्का (IPS Rashmi Shukla) यांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा तपास सीबीआयकडे (CBI) सुपुर्द करावा आणि कठोर कारवाईपासून संरक्षण द्यावे या प्रमुख मागण्या याचिकेतून करण्यात आल्या होत्या. या याचिकेवर सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत फोन टॅपिंग प्रकरणी (Phone Tapping Case) रश्मी शुक्ला यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली. मात्र, शुक्लांविरोधात कारवाई करायची असल्यास मुंबई पोलिसांना सात दिवस आधी नोटीस द्यावी, असेही निर्देश न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला (Government of Maharashtra) दिले आहेत.

 

रश्मी शुक्ला एसआयडीच्या (SID) प्रमुख असताना राज्यात फोन टॅपिंगची घटना घडली होती.
त्या सध्या CRPF च्या दक्षिण विभागाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत आणि त्या हैदराबादमध्ये तैनात आहेत.
शुक्ला यांनी पोलिसांच्या बदल्यांमधील कथित भ्रष्टाचाराबाबत तत्कालीन पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्राचा दाखला
देत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता.
त्यानंतर या प्रकरणाची जोरदार चर्चा झाल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरु केली होती.

 

Web Title :- IPS Rashmi Shukla | Bombay High Court dismisses IPS officer Rashmi Shukla’s petition seeking quashing of FIR registered against her for allegedly tapping phones illegally and leaking confidential reports

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rajkummar Rao | राजकुमार रावच्या नवीन नवरीने बिकमीमध्ये केली मस्ती, तर राजकुमार रावने…

Bigg Boss 15 | ‘तिकीट टू फिनाले’ टास्कमध्ये राखी सावंतवर संतापला तिचा पती रितेश, म्हणाला असं काही की…

 

Pune Crime | ‘ती’ ओरडली कुत्र्यावर अन् ‘त्याने’ शिव्यांचा भडीमार करीत केला ‘विनयभंग’; पुण्याच्या वानवडी परिसरातील घटना