IPS Rashmi Shukla | तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शक्ला यांच्यावर पुण्यात टेलिग्राफ अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी दिली ‘ही’ माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग (Illegal Telephone Tapping) केल्याप्रकरणी न्यायालयात (Court) वाद सुरु असतानाच पुण्यातील (Pune) बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्याविरुद्ध टेलिग्राफ अ‍ॅक्टनुसार (Telegraph Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (Maharashtra State Intelligence Department) तत्कालीन आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर (On Central Deputation) हैदराबाद येथे कार्यरत आहेत. पुणे पोलिसांनी (Pune Police) दिलेल्या माहितीनुसार, याबाबत महाराष्ट्र विधीमंडळ (Maharashtra Legislature) 2021 च्या पावसाळी अधिवेशनामध्ये (Rainy Session) उपस्थित झालेल्या प्रश्नानुसार सरकारने 2015 ते 2019 या पाच वर्षाच्या कालावधीत संपुर्ण फोन टॅपिंग प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय उच्चस्तरीय समिती (Three-Member High-Level Committee) नियुक्त करण्यात आली होती. या समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्यावर आणि इतर संबंधितांवर भारतीय तार अधिनियम (Indian Wire Act) कलम 26 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी शासनाची दिशाभूल करुन काही खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले.
त्यांची ही कृती भारतीय टेलिफोन अ‍ॅक्टचा गैरवापर करणारी आणि संबंधीत व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे,
असा गंभीर ठपका चौकशी अहवालात ठेवला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांनी गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन मुख्य रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा
संदर्भ देऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता.

 

इंडियन टेलिग्राम अ‍ॅक्टनुसार (Indian Telegram Act) राजकीय मतभेद,
व्यावसायिक तंटे, कौटुंबिक कलह अशा स्वरुपाच्या प्रसंगामध्ये फोन टॅपिंक करणे अभिप्रेत नाही.
परंतु या प्रकरणात मूळ उद्देशापेक्षा वेगळ्या प्रयोजनासाठी याचा गैरवापर करुन शासनाची दिशाभूल केल्याचे दिसते.
ही बाब गंभीर असल्याने या बद्दल रश्मी शुक्ला यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले होते.

 

Web Title :- IPS Rashmi Shukla | FIR Against Former Commissioner of Police Pune Rashmi Shakla under the Telegraph Act in Bundgarden Police Station Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा