IPS Rashmi Shukla | भीमा-कोरेगाव दंगल प्रकरण : IPS रश्मी शुक्ला आयोगासमोर हजर; मात्र, ‘या’ कारणामुळं साक्ष नोंदवण्यात आली नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भीमा-कोरेगाव दंगलप्रकरणी आयोगापुढे (bhima koregaon commission) पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांची मुंबईत सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये दोन दिवस साक्ष नोंदवण्यात येणार होती. त्यानुसार रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांनी हजेरी ही लावली. मात्र या संदर्भात आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने शुक्ला यांची साक्ष नोंदवण्यात आली नाही. दरम्यान, सुनावणीची पुढील तारीखही निश्चित झाली नसल्याचे सरकारी वकील शिषिर हिरे (Public Prosecutor Shishir Hire) यांनी सांगितले.

 

२०१८ मध्ये भीमा-कोरेगाव दंगल (bhima koregaon riot case) झाली होती. या प्रकरणी राज्य सरकारने (Maharashtra Government) या प्रकरणी कोलकाता हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल (Retired Chief Justice J. N. Patel) यांच्या अध्यक्षतेखालील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक (Former Chief Secretary Sumit Malik) यांचा चौकशी आयोग नेमला आहे. आयोगाकडून सध्या या प्रकरणात अनेकांच्या साक्ष नोंदवल्या जात आहे. पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची ही साक्ष नोंदवली जात आहे.

 

त्यानुसार शुक्ला (IPS Rashmi Shukla) आयोगासमोर हजर झाल्या. मात्र यावेळी त्यांनी शपथपथी दाखल करण्यासाठी त्यांनी आयोगाकडे वेळ मागितला.
पुणे पोलिसांकडून भीमा-कोरेगाव कार्यक्रमाबाबत काही कागदपत्रे मिळणे बाकी असल्याचे त्यांनी आयोगाला सांगितले.
त्यामुळे साक्ष नोंदवण्यात आली नाही. तसेच पुढील तारीखही निश्चित करण्यात आली नाही.
या प्रकरणात त्यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर असलेले परमबीर सिंह (Parambir Singh) यांनाही समन्स बजावण्यात आले होते; परंतु ते हजर झाले नाहीत.

 

Web Title :- IPS Rashmi Shukla | IPS rashmi shukla appears before bhima koregaon riot case in bhima koregaon riot case Retired Chief Justice J. N. Patel Former Chief Secretary Sumit Malik Parambir Singh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा