महिलेनं सर्वांसमोरच मुलासोबत केलं ‘घाणेरडं’ कृत्य, IPS अधिकार्‍यानं समाजाला दाखवला आरसा (व्हिडीओ)

नवी दिल्ली : एका सोहळ्यात अनेक लोकांच्या समोर एका महिलेने मुलासोबत चुकीचे वर्तन केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. महिलेने असे केल्याने ती मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. सोबतच तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तर आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी महिलेच्या अशा वर्तनावर नाराजी व्यक्त करत म्हटले की, यामुळे मुले महिलांचा सन्मान करण्यास कशी शिकतील?

 

 

 

 

 

मुलाचे पालक सुद्धा जबाबदार
हा व्हिडिओ एखाद्या सोहळ्याचा आहे, ज्यामध्ये एक मुलगा तोंडात नोट ठेवून नृत्य करणार्‍या महिलेला तोंडानेच ती नोट घेण्यास सांगतो, मग ती त्याच्या तोंडातील नोट तिच्या तोंडाने घेते आणि नंतर त्याला किस करण्याचा प्रयत्न करते मुलगा बाजूला होताच ती महिला त्याला खाली पाडून जबरदस्तीने किस घेते, यावेळी आजू-बाजूची मोठी माणसं आनंद घेताना दिसत आहेत.

या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करताना काबरा यांनी लिहिले आहे की, या महिलेसोबत मुलाचे पालक आणि वाईट वर्तणुकीसाठी प्रोत्साहन देणारा प्रत्येकजण यात समान दोषी आहे. मुलांना हे सर्व शिकवले गेले तर ते महिलांचा सन्मान करण्यास कसे शिकतील?

या व्हिडिओवर सायकोलॉजिस्ट आणि पुरुषांच्या अधिकारांवर काम करणारे बिजय सिंह यांनी ट्विटरवर शेयर करत म्हटले की, जर याच्या उलट झाले असते तर काय झाले असते. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले, बस हे प्रकरण उलट करा आणि हेच कृत्य महिलेसोबत झाले असते तर…परंतु तसे झाले नाही. कारण ते आपले शरीर विकत नाहीत. कुणी आहे का जो या महिलेविरूद्ध कारवाई करेल. मला माहित आहे तिच्या विरूद्ध कुणीही कारवाई करणार नाही.