IPS Ritesh Kumar | पुण्यातील गुन्हेगारी नियंत्रणात, मुंबई पेक्षा जास्त पुण्यात प्रतिबंधात्मक कारवाई – पोलीस आयुक्त रितेश कुमार (Video)

कोणाला सोडणार नाही, पोलीस आयुक्तांचा दहशत पसरवणाऱ्या कोयता गँगला इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – IPS Ritesh Kumar | पुण्यात गुन्हेगारी नियंत्रण असून वैयक्तीक वादातून एखादी घटना घडत असते. यामध्ये देखील पोलिसांकडून (Pune Police) कडक कारवाई केली जाते. पुण्यातील गुन्हेगारी टोळ्या संपलेल्या आहेत. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई देखील पाच पटीने वाढवल्या आहे. मुंबई शहरापेक्षा पुण्यात सर्वाधिक प्रतिबंधात्मक कारवाई केल्या आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगच्या (Koyta Gang) दहशती वाढल्या आहेत. वडगाव शेरी भागात कोयता गँगने दहशत माजवली होती. विशेष म्हणजे एका महिला कॉस्टेबलसमोरच हा प्रकार घडला होता. यावर बोलताना पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) म्हणाले, दहशत पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. आम्ही कोणालाही सोडणार नाही, असा इशारा आयुक्तांनी यावेळी दिला.

उरुळी कांचन येथे एका शाळेच्या गेटबाहेर दोन अल्पवयीन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली होती. यासंदर्भात बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले, शाळेच्या कार्यक्रमामध्ये दोन गटामध्ये हाणामारी झाली. 13 ते 14 वयोगटातील हे विद्यार्थी आहेत. सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) यांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले आहे. पुणे पोलिसांकडून शाळा, कॉलेजमध्ये मुलांचे समुपदेशन करण्यात येत आहे. शाळा प्रशासनाने पोलिसांचा बंदोबस्त घेतला पाहिजे. मात्र ते पोलीस बंदोबस्त घेत नाहीत, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.

गॅस सिलेंडर स्फोट प्रकरणाची चौकशी

विमाननगर परिसरातील सिलेंडर स्फोट प्रकरणाची (Viman Nagar Cylinder Blast Case) चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्तांना आदेश दिले आहेत. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. अवैधरित्या गॅस रिफिलींग करणाऱ्या टोळ्यांवर कडक कारवाई करणार आहे. याशिवाय गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर एमपीडीए कायद्यांतर्गत (MPDA Act) कारवाई करणार आहे. तसेच विमानतळ स्फोट प्रकरणामध्ये गॅस एजन्सीचा सहभाग आढळून आल्यास त्यांच्यावर देखील कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर केबलसाठी विनापरवाना ‘खोदाई’