IPS Sachin Atulkar | आयपीएस सचिन अतुलकर फिटनेस मॉडल्सला सुद्धा देतात टक्कर, ‘या’ वर्कआऊट प्लानने बनवली मस्कुलर बॉडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात असे अनेक पोलीस अधिकारी आहेत, जे आपल्या कामामुळे चर्चेत असतात. यावेळी आयपीएस सचिन अतुलकर (IPS Sachin Atulkar) यांचे नाव चर्चेत आहे. कारण त्यांना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळचे एसीपी (ACP of Bhopal) बनवण्यात आले आहे. याआधी ते सर्वात तरुण डीआयजी बनले होते. सचिन अतुलकर (IPS Sachin Atulkar) हे पोलीस खात्यातील अतिशय प्रसिद्ध नाव आहे. ते त्यांच्या कामासाठी आणि फिटनेससाठी ओळखले जातात. त्यांचा फॅन फॉलोईंगही जबरदस्त आहे.

चांगले बॉडी बिल्डर्सही त्यांच्या फिटनेससमोर फिके पडले आहेत. त्यांना सर्वात हँडसम पोलिस ऑफिसर म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या फिटनेसचे रहस्य म्हणजे त्यांचा डाएट आणि वर्कआउट. ते दररोज 1-2 तास जिममध्ये घाम गाळतात.

 

 

सचिन अतुलकर यांचा वर्कआऊट प्लान (Sachin Atulkar’s workout plan)

सचिन अतुलकर आठवड्यातून 5 ते 6 दिवस व्यायाम करतात. ज्यामध्ये ते शरीराच्या सर्व अवयवांचा दिवसानुसार समावेश करतात. याशिवाय ते योगा आणि मेडिटेशन देखील करतात, ज्यामुळे त्यांना मन शांत ठेवण्यास मदत होते.

 

 

 

असा आहे आठवड्याचा वर्कआऊट प्लान

1. पहिला दिवस

छाती आणि ट्रायसेप्स व्यायामाने सुरूवात करतात, ज्यामध्ये 7-8 व्यायामांचा समावेश असतो.

2. दुसरा दिवस

बॅक आणि बायसेप्स (पाठ आणि हात) व्यायाम करतात, ज्यामध्ये ते जड वजन उचलतात.

3. तिसरा दिवस

पायांचे व्यायाम किंवा कार्डिओ (ट्रेडमिल, सायकलिंग इ.) करतात.

4. चौथा दिवस

खांद्याचे (शोल्डर) व्यायाम करतात आणि एकत्रितपणे रली (पोट) चे व्यायाम करतात.

5. पाचवा दिवस

शरीराच्या वीक पार्टवर अधिक लक्ष केंद्रित करून व्यायाम करतात.

 

6. सहावा दिवस

पायांचा व्यायाम करतात किंवा स्लो कार्डिओ करतो.

7. सातवा दिवस

रविवारी ते पूर्ण विश्रांती घेतात, जेणेकरून शरीर रिकव्हर व्हावे. वेळेनुसार ते त्यांचा वर्कआऊट प्लान बदलत राहतात.

इतर फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी

सचिन अतुलकर यांना (IPS Sachin Atulkar) सायकलिंग करतात. त्यांना चालायलाही आवडते, संधी मिळेल तेव्हा ते खूप चालतात.

सचिन अतुलकर यांचा आहार (Sachin Atulkar’s diet)

ते त्यांच्या आहारात हाय प्रोटीन फूड घेतात आणि घरच्या जेवणाला प्राधान्य देतात. ज्यामध्ये चपाती, भात, डाळ, हिरव्या भाज्या, नट, फळे, प्रोटीन शेक इ. चा समावेश आहे.

वयाच्या 22 व्या वर्षी आयपीस झाले

सचिन अतुलकर हे 2007 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी ते आयपीएस झाले. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फॅन पेज आहेत, ज्यावरून त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो.

Web Title :- IPS Sachin Atulkar | ips sachin atulkar looks workout plan diet and fitness secret

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Government Scheme | ‘ही’ सरकारी योजना माजी सैनिकांच्या मुलींच्या लग्नासाठी देते 50,000 ची रक्कम; जाणून
घ्या कसा मिळेल लाभ

Kalicharan Maharaj | कालीचरण महाराज नेकमे आहेत तरी कोण? त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध?

Sharad Pawar | विधानसभा अध्यक्षांची निवडणुक कोणी पुढे ढकलली?, शरद पवारांनी सांगितलं – ‘माझा हात फार लांब आणि…’