IPS Sandeep Karnik | पुण्याचे नवनियुक्त सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी डॉ. रविंद्र शिसवेंकडून स्विकारला पदभार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – IPS Sandeep Karnik | महाराष्ट्राच्या पोलीस (Maharashtra Police) विभागात दोन दिवसांपूर्वी मोठे बदल करण्यात आले. अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Maharashtra IPS Officers Transfer) करण्यात आल्या. मुंबईच्या पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (Addl CP, West Regional Division, Mumbai) म्हणून कार्यरत असलेल्या संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांची पदोन्नतीवर पुण्याच्या सह पोलीस आयुक्तपदी (Joint Commissioner Of Police pune) नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve) हे पुणे सह पोलीस आयुक्त (Pune Police) होते. त्यांची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई (Maharashtra State Human Rights Commission Mumbai) येथे विशेष पोलीस महानिरीक्षक (Special Inspector General of Police) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे नवीन सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी आज (शुक्रवार) मावळते सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांच्याकडून पदाची सूत्रे स्विकारली. (IPS Sandeep Karnik Take Charge As A Pune Joint Commissioner Of Police)

 

राज्य सरकारच्या गृह विभागातर्फे (Maharashtra Home Department) बुधवारी (दि.20) राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचा आदेश जारी केला. गृह विभागाचे सहसचिव वेंकटेश भट (Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी याबाबतचे आदेश जारी केले. पोलीस उपमहानिरीक्षक (Deputy Inspector General of Police) पदाच्या दर्जावरून विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या पदावरील बढतीच्या प्रक्रियेतुन संदीप कर्णिक यांना पुण्याचे पोलीस सह आयुक्त म्हणून बढती मिळाली आहे.

कोण आहेत संदीप कर्णिक ?
संदीप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik) यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियर (Electrical Engineer) पदवी प्राप्त केली.
त्यानंतर 2004 मध्ये ते भारतीय पोलीस सेवेमध्ये (Indian Police Service) दाखल झाले (IPS 2004 Batch).
त्यानंतर त्यांनी नगर (Nagar), ठाणे (Thane), नागपुर (Nagpur), जालना (Jalna), नांदेड (Nanded), पुणे ग्रामीण (Pune Rural) अशा वेगवेगळ्या ठिकाणी कर्तव्य बजावले आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक (Pune Rural SP) म्हणूनही काम पाहिले आहे.
मुंबईत त्यांनी अप्पर आयुक्त म्हणून कर्तव्य बजाविले आहे.

 

Web Title :- IPS Sandeep Karnik | joint commissioner of police ips sandeep karnik took over the charge in pune city police IPS Dr Ravindra Shisve

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा