संजय बर्वे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्‍ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

 

वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक संजय बर्वे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्‍तीचे आदेश राज्य शासनाने आज (मंगळवारी) सायंकाळी काढले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a1be426f-bb48-11e8-9169-a7006bdb11ab’]

पोलीस महासंचालक दत्‍ता पडसळगीकर यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्‍ती झाल्यानंतर संजय बर्वे यांना मुंबईचे पोलिस आयुक्‍त म्हणुन नियुक्‍त करण्यात येईल अशी चर्चा त्यावेळी होती. मात्र, ऐनवेळी केंद्रात प्रतिनियुक्‍तीवर असलेल्या सुबोध कुमार जयस्वाल यांना राज्यात आणण्यात आले आणि त्यांची नियुक्‍ती मुंबईच्या पोलिस आयुक्‍तपदी करण्यात आली. त्यानंतर देखील राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल झाले. नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपुरच्या पोलिस आयुक्‍तांच्या बदल्या करण्यात आल्या.

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की 

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख आणि अप्पर पोलिस महासंचालक संंजय कुमार यांची नवी मुंबईत आयुक्‍त म्हणून तर नागपुरचे पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांची पुण्याच्या आयुक्‍तपदी नियुक्‍ती करण्यात आली. अप्पर पोलिस महासंचालक विवेक फणसळगीकर यांची ठाण्याच्या आयुक्‍तपदी नियुक्‍ती करण्यात आली. पुण्याच्या आयुक्‍त रश्मी शुक्‍ला यांची अप्पर पोलिस महासंचालक (वाहतुक) येथे नियुक्‍ती करण्यात आली. त्यानंतर काही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या होणार अशी चर्चा होती. अखेर आज वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय बर्वे यांची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे.