×
Homeताज्या बातम्याIPS Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंना 'सीबीआयकडून अटक;...

IPS Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंना ‘सीबीआयकडून अटक; जाणून घ्या नेमके प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – IPS Sanjay Pandey | राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (Stock Market) कर्मचार्‍यांचे अवैधरित्या फोन टॅपिंग केल्याप्रकरणी (Phone Tapping Case) सीबीआयने (CBI) आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (IPS Sanjay Pandey) यांना अटक (Arrest) केली आहे. दिल्लीतील न्यायालयाने (Delhi Court) त्यांना ४ दिवस सीबीआय कोठडी (CBI Custody) देण्यात आली आहे.

 

काय आहे हे नेमके प्रकरण
संजय पांडे (IPS Sanjay Pandey) हे नेहमीच आपल्या कामामुळे वादग्रस्त ठरले आहे. यापूर्वी आपल्याला सेवा ज्येष्ठेतेनुसार बढती न दिल्याने त्यांनी अनेकदा थेट टिका टिप्पणी केली होती. त्यातूनच त्यांनी पोलीस सेवेतून निवृत्ती (Police Service Retirement) घेतली होती. २००९ ते २०१४ पर्यंत या काळात संजय पांडे यांनी isec आयसेस सर्व्हिसेस (Ices Services Company) नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (National Stock Exchange) व्यवहाराच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. शेअर बाजारच्या (Share Market) त्यावेळच्या अध्यक्षा चित्रा रामकृष्ण (Chitra Ramakrishna) यांच्या मदतीने संजय पांडे यांच्या कंपनीने २००९ ते २०१७ या कालावधीत एनएसईच्या अनेक कर्मचार्‍यांचे फोन टॅप केले.

 

कर्मचार्‍यांवर नजर ठेवता यावी, यासाठी फोन टॅपिंग मशीनही (Phone Tapping Machine) बसविण्यात आल्या होत्या. भारतीय टेलिग्राफ कायद्यांतर्गत सक्षम अधिकार्‍यांकडून परवानगी न घेता हे टेलिफोन टॅप करण्यात आल्याचा त्यांच्यावर प्रामुख्याने ठपका ठेवण्यात आला आहे. या टेलिफोन टॅपिंगमधून शेअर बाजारातील घडामोडीची गोपनीय माहिती त्यांनी शेअर बाजारातील काही मोठ्या दलालांना देण्यात आली. त्यातून या दलालांनी हजारो कोटी रुपयांचा नफा कमाविल्याचा आरोप आहे. या संपूर्ण कामासाठी संजय पांडे यांना ४ कोटी ४५ लाख रुपये मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सीबीआय व सक्त वसुली संचालनालय (Directorate Of Enforcement) अशा दोन्ही केंद्रीय संस्थांकडून तपास केला जात आहे. याच प्रकरणात सर्व प्रथम सीबीआयने चित्रा रामकृष्ण हिला अटक केली होती. तिच्याकडे केलेल्या चौकशीत अनेक सुरस कथा समोर आल्या. त्यातूनच हे टेलिफोन टॅपिंग प्रकार बाहेर आला. याच प्रकरणात सीबीआयने ८ जुलै रोजी संजय पांडे यांचे निवासस्थान तसेच कार्यालयावर छापा घातला. त्यांच्या कंपनीचे सध्याचे संचालक संतोष पांडे (Santosh Pandey), (संजय पांडे यांची आई), त्यांचा मुलगा अरमान पांडे (Armaan Pandey) तसेच आनंद नारायण (Anand Narayan), मनीष मित्तल (Manish Mittal), नमन चतुवेर्दी (Naman Chatuverdi) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला होता. या छाप्यात सीबीआयने कंपनीच्या कार्यालयातून २५ लॅपटॉप, काही डेस्कटॉप, संगणक ताब्यात घेतले होते. पाठोपाठ शेअर बाजाराचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक रवी नारायण यांचे घर आणि कार्यालयावर सीबीआयने छापे घालून त्यांना अटक केली आहे. रवी नारायण यांनी १९९४ ते २०१३ दरम्यान शेअर बाजारात विविध पदावर काम केले आहे.

 

या प्रकरणात मनी लाँड्रीग (Money Laundering) झाल्याच्या संशयावरुन ईडीने आणखी एक गुन्हा दाखल केला. त्यात १९ जुलै ईडीने संजय पांडे यांना अटक केली होती. त्यानंतर आता सीबीआयने त्यांना अटक केली आहे. (IPS Sanjay Pandey)

 

संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
बढती देताना आपल्यावर अन्याय झाल्याचे कारण पुढे करुन पांडे यांनी २००१ मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा दिला होता.
त्यानंतर त्यांनी आय टी ऑडिट फर्म स्थापन केली. त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही.
त्यामुळे ते पुन्हा पोलीस सेवेत परतले. मात्र, त्यांनी ही कंपनी आपली आई, मुलांच्या नावावर केली.

संजय पांडे हे वेगवेगळ्या पदावर कार्यरत होते. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे (Maharashtra State Security Corporation)
व्यवस्थापकीय संचालक असताना एप्रिल २०२१ मध्ये उद्धव ठाकरे सरकारने (Uddhav Thackeray Government)
त्यांच्याकडे राज्याचे पोलीस महासंचालक (Director General of Police) म्हणून जबाबदारी सोपविली होती.
मात्र केंद्रीय गृह मंत्रालयाने (Union Home Ministry) त्यांच्या निवडीला विरोध करीत अन्य तीन पोलीस अधिकार्‍यांपैकी एकाच निवड करण्याची सूचना केली.
त्यानंतर सरकारने रजनीश सेठ (Rajnish Seth) यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती केली.
त्यानंतर हेमंत नगराळे (Hemant Nagarle) यांच्याकडून त्यांनी आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
संजय पांडे हे मुंबईचे ७६ वे पोलीस आयुक्त होते. गेल्या महिन्यात ३० जून रोजी ते निवृत्त झाले.

 

मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन निवृत्त झाल्यानंतर अटक होणारे संजय पांडे हे दुसरे पोलीस आयुक्त आहेत.
यापूर्वी तेलगी स्टॅम्प घोटाळा प्रकरणात (Telgi Stamp Scam Case) रणजितसिंह शर्मा (Ranjit Singh Sharma)
हे मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन निवृत्त झाल्यानंतर लगेचच त्यांना अटक करण्यात आली होती.

 

Web Title :- IPS Sanjay Pandey | CBI arrests Sanjay Pandey in case of stock market telephone tapping; Find out what exactly is the matter

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Deepak Kesarkar | शिंदे गटात सामील झालेल्या दीपक केसरकरांना लागली लॉटरी, मुंबईच्या पालकमंत्री पदाची मिळाली जबाबदारी

Raj Thackeray | मनसेचा मोठा गौप्यस्फोट ! राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना ‘दसरा मेळाव्यावरून दिला होता ‘हा’ सल्ला, मात्र…’

Nashik Crime | पतीचा निर्घुण खून करुन पत्नी गेली पळून; दुर्गंधी सुटल्याने झाला उलगडा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News