IPS Saurabh Tripathi | अंगडिया प्रकरण ! फरार घोषीत केलेल्या पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींची जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंगडिया खंडणी प्रकरणी (Angadiya Extortion Case) पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. याप्रकरणात पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अंगडिया व्यावसायिकांना चुकीच्या पद्धतीनं ताब्यात घेऊन खंडणी (Ransom) वसूल केल्याचा आरोप पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्यासह चार पोलिसांवर आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सौरभ त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) यांना फरार घोषित (Wanted Accused) केले आहे. तर पोलीस निरीक्षक (PI), सहायक पोलीस निरीक्षक (API) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) यांना अटक (Arrest) केली आहे. दरम्यान, सौरभ त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामिनासाठी (Pre – Arrest Bail) सत्र न्यायालयात (Sessions Court) धाव घेतली आहे. याप्रकरणावर येत्या 23 मार्च रोजी सुनावणी (Hearing) होणार आहे. त्यांच्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.

 

व्यवसायाला परवानगी पाहिजे असल्यास दर महिन्याला 10 लाखांची मागणी पोलीस उपायुक्त सौरक्ष त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) यांनी केली, असा आरोप अंगडिया असोसिएशनने (Angadiya Association) केला आहे. या खंडणी प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) गुन्हे गुप्तचर युनिटने Crime Intelligence Unit (CIU) नुकतेच नव्या खुलाशांचा हवाला देत त्रिपाठीचे नाव या प्रकरणात पाहिजे आरोपी (Wanted Accused) म्हणून घोषित केले आहे. महानगर दंडाधिकारी न्यायालयात (Metropolitan Magistrate Court) 15 मार्च रोजी या प्रकरणाच्या सुनावणीत, गुन्हे शाखेने न्यायालयाला माहिती दिली होती की, त्रिपाठीला इतर आरोपींच्या जबाबाच्या आधारे या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

 

गुन्हे शाखेने कोर्टाला असेही सांगितले की, त्रिपाठीवर 18 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून तो गैरहजर होता. त्याची परिमंडळ 2 मधून परिमंडळ (ऑपरेशन्स) या पदावर बदली करण्यात आली होती. त्याने अद्यापही पदभार स्वीकारला नाही. म्हणूनच त्याचा पाहिजे आरोपी म्हणून शोध सुरु आहे.

सौरभ त्रिपाठी याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात दाखल करणारे अ‍ॅड. अनिकेत निकम (Adv. Aniket Nikam) यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीदरम्यान त्रिपाठी याचे नाव कधीही समोर आले नाही. त्यास या खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. त्यानुसार याप्रकरणी 23 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. यापूर्वी अंगडिया ऑपरेटरकडून 15 ते 18 लाख रुपयांची खंडणी घेतल्या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम (API Nitin Kadam) आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे (PSI Samadhan Jamdade) आणि पोलीस निरीक्षक ओम वंगाटे (Police Inspector Om Wangate) या तीन अधिकाऱ्यांना निलंबित (Suspended) करुन नंतर त्यांना एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याच्या (LT Marg Police Station) पोलिसांकडून अटक करण्यात आली.

 

10 लाख मागितल्याचा आरोप
मागील वर्षी डिसेंबरमध्ये, अंगडिया असोसिएशनने मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai CP Hemant Nagarale) यांच्याशी संपर्क साधला.
त्रिपाठी याने व्यवसाय सुरु ठेवण्याच्या परवानगीसाठी 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला.
यानंतर नगराळे यांनी या आरोपांच्या चौकशीसाठी दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत (Addl CP Dilip Sawant) यांची नियुक्ती केली.
सावंत यांच्या तक्रारीवरुन एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला.

 

Web Title :- IPS Saurabh Tripathi | angadia extortion case dcp saurabh tripathi files anticipatory bail plea in mumbai court

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा