IPS Saurabh Tripathi | गुन्हे शाखेच्या उपायुक्तांकडूनच खंडणीची मागणी?, DCP सौरभ त्रिपाठी फरार घोषीत, मुंबई पोलीस दलात खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) अंगडिया खंडणी प्रकरणी (Angadiya Extortion Case) पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) यांना फरार आरोपी (Wanted Accused) घोषित केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) हे मागील काही दिवसांपासून त्यांच्या कामावर आलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी सौरभ त्रिपाठी यांना फरार घोषीत केल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. पोलीस उपायुक्तांना फरार घोषीत केल्याने महाराष्ट्र पोलीस दलात (Maharashtra Police) प्रचंड खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) याच प्रकरणात एल.टी.मार्ग पोलीस ठाण्याचे (LT Marg Police Station) पोलीस निरीक्षक ओम वंगाटे (Police Inspector Om Wangate) यांना गेल्या आठवड्यात अटक (Arrest) केली होती. आता पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) यांना फरार घोषित केले आहे. या संबंधित प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत असून या प्रकरणात आणखी कुणाकुणाची नावे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

काय आहे प्रकरण?
लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे (Lokmanya Tilak Marg Police Station) पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्यावर मुंबादेवी (Mumbadevi) परिसरातील अंगडिया व्यवसायिकांकडून खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत (Addl CP Dilip Sawant) यांनी घेतली. त्यांनी या प्रकरणी तक्रार केली. त्यानंतर एल.टी.मार्ग पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम (API Nitin Kadam) आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे (PSI Samadhan Jamdade) या तीन अधिकाऱ्यांवर खंडणी आणि लुटीचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ओम वंगाटे यांनाही अटक करण्यात आली आहे.

 

Web Title :- IPS Saurabh Tripathi | mumbai police names dcp saurabh tripathi as wanted accused in angadiya extortion case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMC Medical College Pune | …म्हणून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय PPP तत्वावर चालविण्याचा प्रस्ताव

 

Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला 4 महिन्यांनी गुन्हे शाखेकडून अटक

 

Supriya Sule | 2022-23 च्या अर्थसंकल्पात काश्मिरी पंडितांसाठी काय तरतूद केली? सुप्रिया सुळेंचा केंद्रावर निशाणा