IPS Saurabh Tripathi | निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींना न्यायालयाचा दिलासा, अंगडीया खंडणी प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी (Angadia Extortion Case) उकळल्याप्रकरणी एलटी मार्ग पोलिस ठाण्यात (LT Marg Police Station) दाखल झालेल्या गुन्ह्यात निलंबित (Suspended) पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) यांना अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) सौरभ त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) यांच्या अटकेला स्थगिती देताना त्यांना 9 नोव्हेंबर रोजी चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते. अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) अर्जावर आज सुनावणी झाली.

 

निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) यांना अंगडिया खंडणी प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्रिपाठी यांना 25 हजारांच्या जामीनावर अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. त्रिपाठी तपासांत पूर्ण सहकार्य करत असल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टाला माहिती दिली.

 

अंगडिया व्यावसायिकांकडून प्रोटेक्शन मनीच्या (Protection Money) नावाखाली त्यांच्याकडून खंडणी मागितल्याचा आरोप सौरभ त्रिपाठी यांच्यावर होता. मात्र त्रिपाठी यांनी हे आरोप फेटाळले होते. या प्रकरणात त्यांना फरार घोषीत केल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. या प्रकरणात अन्य तीन पोलीस अधिकाऱ्यांचे देखील निलंबन करण्यात आले होते. मात्र त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलेले आहे. तिघेही अधिकारी आपआपल्या सेवेत कार्य़रत आहेत. त्यानंतर त्रिपाठी यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. हाय कोर्टाने अटकेपासून संरक्षण देत तपास यंत्रणेसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्रिपाठी हे तपास यंत्रणेसमोर हजर झाले. त्यांनी तपासात पूर्ण सहकार्य़ केलं. तसेच आपला मोबाइल देखील त्यांनी तपास अधिकाऱ्यांकडे (Investigating Officer) दिला. या सर्व गोष्टींची नोंद घेत मुंबई हायकोर्टाने त्रिपाठी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करताना कोर्टाने कोणत्याही अटी शर्ती घातलेल्या नाहीत. त्यामुळे त्रिपाठींना मोठा दिलासा मिळाला आहे.

अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुल केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सौरभ त्रिपाठी यांच्यावर आरोपपत्र (Charge Sheet) दाखल केले होते. मुंबई क्राईम ब्रँचच्या (Mumbai Crime) मुंबई क्राईम इंटेलिजन्स युनिटने (Mumbai Crime Intelligence (CIU) याप्रकरणी 1100 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्रामध्ये 70 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये काही अंगडिया व्यावसायिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. IPS सौरभ त्रिपाठी यांच्यावर अंगडिया व्यावसायिकांकडे हप्ता मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणात CIU ने आतापर्यंत अनेक जणांना अटक केली आहे.

 

काय आहे प्रकरण?
IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्यावर आरोप आहे की झोन-2 चे पोलीस उपायुक्त असताना त्यांनी पैशांची मागणी केली.
त्यांनी आंगडिया व्यापाऱ्यांकडे दरमहा 10 लाख रुपयांच्या हप्त्याची मागणी केली.
त्रिपाठी यांच्या त्रासाला कंटाळून अंगडिया व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्रिपाठी यांनी डिसेंबर महिन्यात अनेक वेळा
आयकर विभागाला (Income Tax Department) रोखीने व्यवहार केल्याची माहिती देण्याची धमकी देऊन पैसे उकळले.
अंगडिया व्यापाऱ्यांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र सरकारने आरोपी पोलीस उपायुक्त (DCP) सौरभ त्रिपाठी यांना मार्चमध्ये निलंबित केले.

 

Web Title :- IPS Saurabh Tripathi | suspended dcp saurabh tripathi granted anticipatory bail in angadia extortion case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Eknath Shinde | ‘पुन्हा एखादा OK मधी सगळं’??; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटी येथे जाणार

Rajkumar Rao-Shahnaz Gill | काय सांगता, खरच राजकुमार राव वडील होणार ?, शहनाज गिलसमोर केला मोठा खुलासा

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या जामिनाचा निकाल राखीव; काय होणार याकडे सर्वांची उत्सुकता