जम्मू-काश्मीरच्या ‘या’ माजी DGPच्या मते HM अमित शहांच्या धोरणामुळे आता ‘न्याय’ मिळेल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या काश्मीर बाबतच्या धोरणामुळे जम्मू-काश्मीरचे माजी पोलिस महासंचालक शीशपाल (एसपी) वैद सध्या खुप आनंदित आहेत. शहांची धोरणे काश्मीर खोर्‍यात न्याय घेवुन येतील असे एसपी वैद यांचे म्हणणे आहे. वैद यांनी शहांच्या धोरणावर आनंद व्यक्‍त करून त्यांनी काश्मीर खोर्‍यातील पंडितांचे देशातील दुसर्‍या राज्यात होणार्‍या स्थलांतरांच्या घटनेवर प्रकाश टाकला.

एसपी वैद हे जम्मू-काश्मीरमधील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. अमित शहांच्या धोरणामुळे काश्मीर खोर्‍यातील विस्थापितांना आणि पश्‍चिमी पाकिस्तानी शरणार्थींंना खर्‍या अर्थाने न्याय मिळेल. जम्मू मधील नागरिक गेल्या अनेक वर्षापासुन पुनर्रचनेची मागणी करीत आहेत.

कोण आहेत एसपी वैद
एसपी वैद हे जम्मू-काश्मीर केडरचे सन 1984 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. डिसेंबर 2016 ते सप्टेंबर 2018 दरम्यान ते जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक होते. त्यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ऑल आऊट मध्ये अनेक अतिरेक्यांना कंठस्थान घालण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्याच कार्यकाळात दक्षिण काश्मीर मध्ये अतिरेक्यांनी अनेक पोलिस कर्मचारी आणि अधिकार्‍यांचे अपहरण केले होते. त्या घटना वाढल्यानंतर एसपी वैद यांना पोलिस महासंचालक पदावरून हटविण्यात आले आणि त्यांना वाहतूक आयुक्‍त पदी नेमण्यात आले. वैद यांना महासंचालक पदावरून हटविल्यानंतर त्यांच्या जागी कारागृहाचे महासंचालक दिलबाग सिंह यांची महासंचालक म्हणुन नियुक्‍ती करण्यात आली होती.

पुनर्रचनेच्या मुद्यावर गृह मंत्रालयाचे मत
जम्मू-काश्मीरचे माजी पोलिस महासंचालक पुनर्रचना ही वेळेची गरज असल्याचे सांगत असले तरी देखील गृह मंत्रालयातील सुत्रांनुसार अद्याप याबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. याबाबत कुठलाही प्रस्ताव तयार केलेला नाही. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात शेवटी सन 1995 मध्ये पुनर्रचना झाली होती. जम्मू-काश्मीरमध्ये दर 10 वर्षानंतर पर्नरचना करण्याची व्यवस्था आहे. मात्र, सन 2002 मध्ये फारूक अब्दुल्‍ला सरकारने पुनर्रचनेवर सन 2026 पर्यंत बंदी घातली होती.