अभिनेत्री पण आहे ‘ही’ दबंग IPS अधिकारी ;  31 मे ला रिलीज होणार दुसरा चित्रपट 

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मध्यप्रदेश पोलिस दलात कार्यरत असलेल्या IPS अधिकारी सिमाला प्रसाद या पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहेत. यापुर्वी त्यांनी ‘अलिफ’ या चित्रपटामध्ये महत्वपुर्ण भुमिका केली होती. यावेळी त्या अभिनेता इनामुलहक बरोबर अभिनय करताना दिसतील. इनामुलहक यांनी ‘एअरलिफ्ट’ आणि ‘जॉली एलएलबी-2’ मध्ये महत्वाची भुमिका केली होती.

एका इंग्रजी वर्तमान पत्राला दिलेल्या मुलाखतीत सिमाला प्रसाद यांनी नोकरी आणि एखाद्या चित्रपटात अभिनय करताना कशाप्रकारे समतोल ठेवावा लागतो हे सांगितले आहे. चित्रपटातील भुमिकेचा सराव करून सिमाला त्याचा व्हिडीओ तयार करून डायरेक्टर पाठवतात. सिमाला प्रसाद यांचा आगामी चित्रपट दि. 31 मे रोजी रिलीज होणार आहे. आपल्याला जी गोष्ट आवडते त्यासाठी सर्वांनी वेळ काढायला हवा असे त्यांचे मत आहे. पोलिस अधिकारी असल्यामुळे मला चित्रपटाची कथा वाचण्यास आणि भुमिकेचा सराव करण्यास मिळत नाही. खुप दिवसांपुर्वी डायरेक्टरने चित्रपटाची स्क्रिप्ट पाठवली होती. वेळ काढुन ती स्क्रिप्ट मी वाचली आणि त्यानुसार भुमिकेसाठी सराव केला. चित्रपटामध्ये मी एका महिला पत्रकाराची भुमिका साकारणात आहे. त्यामुळे हावभाव आणि व्यक्‍तिमत्वावर लक्ष देण्याची गरज असल्याचे सिमाला यांनी सांगितले.

कोण आहेत IPS सिमाला प्रसाद
सिमाला प्रसाद या सन 2011 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे वडिल भागीरथ प्रसाद हे प्रशासकीय सेवेत होते. सेवानिवृत्‍ती नंतर ते राजकारणात आले. भारतीय जनता पक्षाकडून सन 2014 मध्ये त्यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी ते खासदार म्हणून निवडुन आले. सिमाला यांची आई मेहरून्‍निसा परवेज या साहित्यकार आहेत. चार महिन्यांपुर्वी मध्यप्रदेशात विधानसभेसाठी निवडणुका झाल्या. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या रॅलीचा एक फोटो सिमाला प्रसाद यांनी ट्विट केला होता. त्यावर काँग्रेस पक्षाने गदारोळ करून सिमाला प्रसाद यांची निवडणुक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर सिमाला प्रसाद यांना राजगडच्या पोलिस अधीक्षक पदावरून पायउतार व्हावे लागले आणि त्यांची बदली पीएचक्युमध्ये करण्यात आली होती.