सुबोधकुमार जयस्वाल राज्याचे नवे महासंचालक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रॉ सारख्या भारताच्या केंद्रीय सुरक्षा संस्थेमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांना आहे.

सुबोधकुमार जायस्वाल हे १९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते केंद्रीय गुप्तचर यंत्रणा रॉ मध्ये उच्चपदावर काम प्रतिनियुक्तीवर काम करत होते. राज्य सरकारने २०१८ मध्ये त्यांना पुन्हा राज्याच्या सेवेत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी केंद्रानेही त्याला मंजूरी दिली. त्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली होती. नुकतेच राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदत वाढ देण्यास केंद्राने नकार दिला. राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून सुबोधकुमार जायस्वार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्पुर्वी ते एटीएसचे डिआयजी म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी २००६ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपासही केला होता.