IPS Transfers : राज्यातील 4 आयपीएस अधिकार्‍यांना पदोन्नती अन् बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   राज्य गृह विभागाने राज्यातील 4 भारतीय पोलिस सेवेतील उपविभागीय पोलिस अधिकारी श्रेणीतील अधिकार्‍यांना पदोन्नती दिली असून त्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्याबाबतचे आदेश गृह विभागाने बुधवारी रात्री काढले आहेत.

पदोन्नती आणि बदली झालेल्या अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली त्याबाबत पुढील प्रमाणे –

पवन मारूती बनसोडे (उपविभागीय अधिकारी, वाशिम, जि. वाशिम ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट-13, वडसा देसाईगंज)

सौरभ कुमार अग्रवाल (उपविभागीय अधिकारी, चोपडा, जि. जळगाव ते अप्पर पोलिस अधिक्षक, अहमदनगर)

निलाभ रोहन (प्रतिक्षाधीन ते पोलिस अधिक्षक, विशेष कृती गट, नक्षलवाद विरोधी अभियान, नागपूर)

यतिश देशमुख (उपविभागीय पोलिस अधिकारी, हिंगोली शहर ते उपविभागीय पोलिस अधिकारी, वैजापूर, जि. औरंगाबाद)

अहमदनगरचे अप्पर पोलिस अधिक्षक दत्ता राठोड यांची अहमदनगर येथून बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

You might also like