IPS Transfers : राज्यातील 3 पोलिस उप महानिरीक्षकांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने 3 पोलिस उप महानिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून बुधवारी रात्री उशिरा निर्गमीत करण्यात आल्या आहेत.

बदली झालेल्या अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली हे पुढील प्रमाणे –

संजय येनपुरे (अप्पर आयुक्त – प्रशासन, ठाणे शहर ते अप्पर आयुक्त – गुन्हे, ठाणे शहर)

प्रविण पवार (अप्पर आयुक्त – गुन्हे, ठाणे शहर ते अप्पर आयुक्त – प्रशासन, ठाणे शहर)

महादेव तांबडे (संचालक (अभियान), महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई ते संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे (सध्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्रेणीतील पद पोलिस उप महानिरीक्षक श्रेणीमध्ये अवनत करून)

You might also like