३५ पेक्षा जास्त परिक्षेत ‘फेल’ होणाऱ्या विजयचा अखेर ‘विजय’ ; ‘UPSC’मध्ये १०४ वी ‘रँक’ मिळवत बनला ‘IPS’

नवी दिल्ली : या वर्षात UPSC मध्ये १०४ वी रँक मिळवून IPS अधिकारी झालेल्या हरियाणाच्या विजय वर्द्धन ची संघर्ष कहाणी आत्मविश्वास गमावून बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देऊन जाते. अल्पशा अपयशाने खचून जाणाऱ्या प्रत्येकाला ही कहाणी प्रेरणा देऊन जाईल. विजय यांनी कठीण काळात संयम सोडला नाही आणि अखेर ते यशस्वी झाले. चला जाणून घेऊ या विजय यांची स्फूर्तिदायी कहाणी.

विजय हरियाणाच्या सिरसा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. UPSC परीक्षा पास होण्याआधी विजय ३५ पेक्षा अधिक स्पर्धा परीक्षांमध्ये नापास झाले होते. २०१९ च्या आधी विजयने UPSC ची चार वेळेस परीक्षा दिली होती. जवळच्या नातेवाईकांनी विजयला परीक्षा न देण्याचा सल्ला दिला होता. पण पाचव्या प्रयत्नात विजयला यश मिळाल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आता विजय जीवनात सातत्याने अपयशाचा सामना करणाऱ्यांसाठी आदर्श बनले आहेत.

इंजिनिअरिंग करून गाठली दिल्ली
विजयने दिलेल्या माहितीनुसदार, २०१३ ला इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर विजय दिल्ली सिव्हिल सर्व्हिसची तयारी करण्यासाठी दिल्लीला आला होता. २०१४ मध्ये विजयने UPSC ची पूर्वपरीक्षा पस झाला आणि मुख्य परीक्षा दिली. यानंतर २०१५ मध्ये देखील मुख्य परीक्षेत विजय नापास झाला.

मुख्य परीक्षा पास तर मुलाखतीत नापास
२०१६ वर्षात विज मुख्य परीक्षा पास तर मुलाखतीत नापास य मुख्य परीक्षा पास झाला पण ६ गुणांनी मुलाखतीत अपयश आले. २०१७ वर्षामध्ये देखील विजय मुलाखतीत नापास झाला. अशाच पद्धतीने राजस्थान सिविल सर्विस, हरियाणा सिविल सर्विस, यूपी सिविल सर्विस, SSC, सीजीएल या परीक्षांमध्ये देखील विजयला अपयश आले.

विजय म्हणतो की, काहीच गुणामुळे यश हुलकावणी देत होते. मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर सुद्धा कधी मेडिकल तर कधी डॉक्यूमेंट वेरिफिकेशन मुळे माझी निवड झाली नाही. पण आता मला समजलय की अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते.

सिनेजगत बातम्या
Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like