IPS Vishwas Nangare Patil | आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आवाहन; म्हणाले – ‘माझ्या नावाने बनावट खातं, सावध रहा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – IPS Vishwas Nangare Patil | अलिकडील काळामध्ये सायबर गुन्हेगारीत (Cyber Crime) लक्षणीय वाढ झाली आहे. सोशल मिडीयावर फेक आणि बनावट अकाऊंट (Fake Accounts On Social Media) उघडून अनेकांना जाळयात आढून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काही प्रकार देखील यापुर्वी समोर आले आहेत. सोशल मिडीयावर असेच एक बनावट अकाऊंट तयार केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील (IPS Vishwas Nangare Patil) यांच्या नावाचे बनावट अकाऊंट सायबर गुन्हेगारांनी बनविल्याचे उघडकीस आले आहे. सध्या विश्वास नांगरे पाटील हे राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (Anti Corruption Bureau Mumbai) अप्पर पोलिस महासंचालक Additional Director General Of Police (ADG) म्हणून कार्यरत आहेत.
याबाबत स्वतः विश्वास नांगरे पाटील यांनी माहिती दिली आहे. ते म्हणतात, माझे बनावट फेसबुक अकाऊंट (Fake FB Account) का चिटर लोकांनी तयार केलं आहे. त्या अकाऊंटवरून लोकांशी चॅटिंग केलं जातंय. रँडम मेसेजेस पाठविले जात आहेत. याप्रकरणी कायदेशीर कारवाई (Legal Action) केली जात आहे. पण बनावट खात्यावरून येणार्या मेसेजेसना कोणीही रिप्लाय करू नका अथवा कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका. यातून फसवणूकीचा प्रयत्न होऊशकतो असंही विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
यापुर्वी देखील काही प्रशासकीय अधिकार्यांचे बनावट अकाऊंट सायबर गुन्हेगारांनी बनविल्याची माहिती समोर
आली आहे. त्याबाबत वेगवेगळया ठिकाणी गुन्हे देखील दाखल आहेत.
Web Title :- IPS Vishwas Nangare Patil | ips vishwas nagare patils fake account on fb ADG VNNPatil says be aware
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Police Crime Branch News | मोबाईल हिसकाविणार्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, अल्पवयीन ताब्यात