अयोध्या प्रकरणातील मुस्लिम पक्षकाराचं राहुल गांधींना ‘ओपन चॅलेंज’, ‘दम’ असेल तर PoK मध्ये जाऊन राजकारण करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्या प्रकरणातील मुस्लिम पक्षकार इकबाल अन्सारी हे काॅंग्रेस नेते आणि राहुल गांधी यांच्या काश्मीर दौऱ्यावरून चांगलेच भडकले. त्यांनी राहुल गांधी यांना आव्हान दिले. ते म्हणाले कि, दम असेल तर तुम्ही पाकव्याप्त काश्मीर मध्ये राजकारण करा. अन्सारी म्हणाले, देशात आणखी दुसरी ठिकाणे आहेत त्या ठिकाणी जाऊन राजकारण का करत नाही. तिकडे का जात नाहीत. ते पाकव्याप्त काश्मीर मध्ये जाऊन राजकारण का करत नाहीत काश्मीर मधेच राजकारण का करत आहे.

मोदींच्या निर्णयाचे केले कौतुक
काश्मीर मध्ये काँग्रेसने कलम ३७० लागू करून काश्मीर च्या नावाखाली तब्बल ७० वर्ष राजकीय फायदा लाटला. आजघडीला काश्मीर मधील लोकांची अवस्था अतिशय बिकट आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कलम ३७० काढून टाकून देशात एकाच कायदा व्यवस्था लागू केली आहे. कलम ३७० रद्द केले गेल्यामुळे काश्मीरच्या नागरिकांचे भले झाले आहे. अन्सारी म्हणाले कि, राहुल गांधी आणि काँग्रेसला जर देशाची चिंता असेल तर त्यांनी पाकिस्तानला जाऊन किंवा अन्य ठिकाणी जाऊन समस्यांचे निरसन करावे. परंतु, काँग्रेस ने काश्मीरवर राजकारण करू नये.

काँग्रेसचे राजकरण आता संपणार
अन्सारी यांनी भारतीय मुस्लिमांची वीर अब्दुल हमीद यांच्याशी तुलना केली. ते म्हणाले की, भारतीय मुस्लिम देशासाठी पाकिस्तानशी लढायला तयार कधीही तयार आहेत. पाकिस्तानला भारताने नेहमीच मात दिली आहे. त्याचबरोबर काँग्रेस काश्मीरवर राजकारण करत आहे. या देशातल्या हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चनांना येथे केवळ शांतता हवी आहे. कॉंग्रेसचे राजकारण आता संपणार नक्कीच आहे. असे वक्तव्य अन्सारी यांनी केले.

आरोग्यविषयक वृत्त –