25 ला भारतात लाँच होणार iQoo 3 स्मार्टफोन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – iQoo 3 स्मार्टफोन २५ फेब्रुवारी रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे. स्मार्टफोन ५जी कनेक्टिविटी सह येणार असून यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ चिपसेट दिला आहे. भारत आणि चीन मध्ये एकाच दिवशी फोन लाँच करण्यात येणार आहे. फोन लाँचसाठी मीडियाला या कंपनीने निमंत्रण पाठवले आहे.

भारतात या फोनची विक्री करण्यासाठी कंपनीने फ्लिपकार्टसोबत आपल्या कराराची घोषणा केली आहे. तसेच कंपनीची अधिकृत साइट iQoo.com यावरूनही या फोनची विक्री करण्यात येणार आहे. iQoo ने ऑनलाइन मार्केटमधून आपला स्मार्टफोन विक्री करण्याचे ठरवले आहे. भारतात हा फोन वनप्लस, हुवेई आणि शाओमीशी ला टक्कर देणार आहे. गेल्या महिन्यात विवोचा सब ब्रँड आयकोने भारतात आपली सुरूवात केली होती. तसेच स्वतंत्रपणे स्मार्टफोन लाँच केला होता. हा फोन २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार आहे. कंपनीच्या सोशल मीडिया चॅनेलवरूनही हा फोन लाँच करण्यात येणार आहे.

iQoo 3 स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर देण्यात आला आहे. यात जबरदस्त कॅमेरा, दमदार बॅटरी आणि पॉवरफुल गेमिंग परफॉर्मन्स आहे, असा कंपनीचा दावा आहे. कंपनीच्या टीझर्समधील माहितीनुसार, या फोनमध्ये चार रियर कॅमेरे असणार आहेत. ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असणार आहे. यात १२ जीबी रॅम ही असू शकते.