भारताचा पहिला 5G स्मार्टफोन 25 फेब्रुवारीला होणार लाँच, आतापर्यंतचा सर्वात ‘दमदार’ प्रोसेसर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – विवोचा सब-ब्रँड IQOO भारताचा पहिला 5 जी स्मार्टफोन आणण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीचा फोन IQOO 3, 25 फेब्रुवारी रोजी भारतात लाँच होणार आहे. या नव्या फोनचा टीझर फ्लिपकार्टवर प्रसिद्ध करण्यात आला आहे, फ्लिपकार्टने खुलासा केला की, फोनला AnTuTu वर आतापर्यंतची सर्वाधिक स्कोर मिळाला आहे. म्हणजेच हा फोन आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली फोन असल्याचे सिद्ध होणार आहे.

यादीनुसार, IQOO 3 ला एकूण 5,97,583 पॉईंट मिळाले आहेत, जे आतापर्यंतच्या AnTuTu वर सर्वात जास्त नोंद झालेली आहे. त्याच्या प्रोसेसरमुळे हे झाल्याचे म्हटले जात आहे. IQOO 3 मध्ये लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट प्रोसेसर देण्यात आले आहे. याशिवाय असेही म्हटले जात आहे की, या फोनमध्ये 6.44 इंचाचा एमोलेड पॅनेल डिसप्ले असेल, जो एचडी रेझोल्यूशनसह येईल.
iQOO 3
फोनमध्ये 4 कॅमेरे !
कॅमेर्‍याविषयीच्या आलेल्या अफवांमध्ये सांगितले जात आहे की, फोनला क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात येईल, ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर असेल. तसेच, समोर पंच होलसह 16 मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो. याशिवाय फोनमध्ये पॉवरसाठी 4,410 एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते, जी 55 डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, IQOO 3 हा परफॉर्मन्स आणि बेस्ट 5 जी तंत्रज्ञानाचा कॉम्बो असेल. हा फोन सर्वोत्कृष्ट कार्यप्रदर्शन, उत्कृष्ट कॅमेरा, हाय बॅटरी पॉवर आणि उत्कृष्ट गेमिंग अनुभव देईल.

फोनची किंमत :
दरम्यान, कंपनीने IQOO 3 च्या किंमतीबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही, परंतु विश्वास आहे की, 40,000 रुपयांच्या सेक्टरमध्ये हा फोन वनप्लस आणि सॅमसंगला टक्कर देऊ शकेल.