बॉयफ्रेंडला सोडून ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करू इच्छिते इरा आमिर खान ! कधी होती आमिरची को-स्टार

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड स्टार आमिर खानची लाडकी इरा खान ही काही ना काही कारणानं चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच इरा आपल्या एका विचित्र फोटोशुटमुळं चर्चेत आली होती. सोशलवर इराची फॅन फॉलोविंग एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. पुन्हा एकदा डेटींगमुळं ती चर्चेत आली आहे.

अलीकडेच इरानं सोशलवर असं काही पोस्ट केलं आहे जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तिनं इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अॅक्ट्रेसला डेट करण्याची इच्छा व्यक्त केलं आहे. ही यंग अॅक्ट्रेस आमिर खानची कोस्टारदेखील आहे.

इरानं इंस्टा स्टोरीवरून चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली होती. एकानं तिला विचारलं की, क्वारंटाऊमध्ये काय करत आहेस ? यावर इरानं खूपच रंजक उत्तर दिलं. इरा म्हणाली, “विचार करत आहे की, सान्या मल्होत्राला डेट करू.” इराचं हे उत्तर चाहत्यांना खूप आवडलं आहे.

इरानं पोस्टमध्ये सान्या मल्होत्राला टॅग करत लिहिलं की, “तू बाकी लोकांना निवडण्याआधी मला निवडायला हवं.” आता यावर सान्या मल्होत्रा नेमकी काय प्रतिक्रिया देते हे पाहणं जास्त उत्सुकतेचं ठरणार आहे.

लाईमलाईटपासून दूर असणारी इरा आपला वेळ आपले मित्र, कुटुंबीय किंवा अशा कामात घालवते जे केल्यानं तिला आनंद मिळेल. इरा जवळपास रोज म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की आपल्या फोटोंमुळे चर्चेत येत असते.

You might also like