बॉयफ्रेंडसोबत शेअर केला Ira Khan ने फोटो, लॉकडाउनमध्ये झाले दोघेही रोमँटीक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान नेहमीच तिच्या फोटोमुळे चर्चेत असते. आमिर खानचा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसह असेल्या अफेअरमुळे रोज इरा खानच्या चर्चा रंगलेल्या असतात. इरा तिच्या बॉयफ्रेंडसह सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते व नवल म्हणजे गेल्या वर्षीच इरा खान आणि नुपूर शिखरे लॉकडाऊन दरम्यानच एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

दोघांची जवळीक तेव्हा वाढली जेव्हा इरा खान फिटनेसकडे वळली. अलीकडे महाबळेश्वरमधील फार्महाऊसवर इरा आणि नूपूर निवांत क्षण एन्जॉय करताना दिसून आले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा लॉकडाऊन झाला तरी इराला अजिबात फरक पडणार नाही असं तिच्या इंस्टाग्राम स्टोरी वरून दिसत आहे. इराचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.