खुशखबर ! ‘पेट्रोल-डिझेल’चे दर वाढणार नाहीत, UAE दिले मोदी सरकारला ‘हे’ आश्वासन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेने इराणकडून तेल खरेदी करण्यास घातलेल्या प्रतिबंधानंतर आता भारताने नवीन निर्णय घेतला आहे. याआधी अमेरिकेने इराणवर तेलविक्रीसाठी निर्बंध घातल्याने भारताला याचा सर्वात मोठा फटका बसला होता. मात्र या सगळ्यात इंधनाचे भाव वाढण्याची चिंता सतावत असतानाच संयुक्त अरब अमिरात (UAE)ने यासंदर्भात भारताला मोठा दिलासा दिला आहे. इराणवरील निर्बंधामुळे इंधना पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाल्यास तो भरून काढला जाईल असे आश्वासन युएईने भारताला दिले आहे. UAEचे भारतातील राजदूत अहमद अल बन्ना यांनी ही माहिती दिली. इराण आणि अमेरिकेतील तणावावर भारताने चिंता व्यक्त केली आहे. आता ‘पेट्रोल-डिझेल’चे दर वाढणार नाहीत, UAE दिले मोदी सरकारला त्या बाबत आश्वासन दिले आहे.

आता दरवाढीची चिंता कमी झाली आहे. होर्मुजमधील जलडमरुम येथे झालेल्या घटनांवर भारताने काळजी व्यक्त केली होती. यावर बन्ना यांनी बोलताना म्हटले कि,अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे भारताला तेलाची कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. याआधीही भारताने UAE कडून तेल विकत घेतले आहे. त्यामुळे याची पूर्तता UAE करेल. या सगळ्यात अमेरिकेकडून देण्यात आलेल्या सवलतीनंतर भारताने मे महिन्यापासून इराणकडून इंधन आयात रोखली होती. त्यामुळे भारतात इंधन दरवाढीचे संकट पुन्हा घोंघावू लागले होते. अमेरिका आणि इराण यांच्यात पूर्वीपासून तणाव असला तरी इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडल्यानंतर हा तणाव पुन्हा वाढला आहे. त्याआधीदेखील इंधनाचे टँकर पेटवून देण्यात आले होते. त्यामुळे या सगळ्यात अमेरिका आणि इराण यांच्यात कुरबुरी सुरूच असतात.

पाकिस्तानला ३ अरब डॉलरची मदत
या सगळ्यात आर्थिक संकटातून जाणाऱ्या पाकिस्तानला कतारने ३ अरब डॉलरची मदत केली आहे. मागील ११ महिन्यात पाकिस्तानला मदत करणारे कतार हे चौथे राष्ट्र आहे. कतारचे राजे अमीर शेख तमीम बिन हमाद यांनी कालच पाकिस्तानचा दौरा पूर्ण केला. यात त्यांनी व्यापार, दहशतवाद यांसह विविध विषयांवर चर्चा केली. पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात असल्याने त्यांच्यासाठी हि मदत फार महत्वाची आहे.
आरोग्य विषयक वृत्त –
या’ घरगुती उपायांनी काळ्या ओठांना बनवा मऊ आणि गुलाबी
पाठदुखी का होते ? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय
‘या’ गोष्टी फॉलो करा आणि निकालाचे नैराश्य घालवा
या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉंगटर्म’ फायदे

You might also like