डोनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद करण्याला इराणकडून 8 कोटी डॉलर्सचं बक्षिस जाहीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर आता इराण आक्रमक झालं आहे. अमेरिकेचे राषट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद करण्यासाठी इराणनं बक्षीस जाहीर केलं आहे. ट्रम्प यांचा शिरच्छेद करणाऱ्याला तब्बल 8 कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे 5.76 अब्ज रुपये एवढं बक्षिस जाहीर केलं आहे.

सुलेमानी यांच्या अंत्य संस्कारावेळी इराणने हे बक्षिस जाहीर केलं आहे. यासाठी इराणच्या प्रत्येक नागरिकानं एक डॉलर दान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

अमेरिकेनं कासिम सुलेमानी यांना ठार केल्यानंतर इराणच्या प्रत्यके रस्त्यावर याचा द्वेष पाहायला मिळत आहे. राष्ट्रपती भवनातही असंच चित्र पहायला मिळालं. सुलेमानी यांची मुलगी जेनाब कासिम सुलेमानी हिनं इराणच्या राष्ट्रपतींची भेट घेतली. तिनं जे काही वक्तव्य केलं आहे त्यानंतर इराणी जनता अमेरिकेविरोधात आणखीच पेटून उठली आहे.

जेनाब सुलेमानी हिनं राष्ट्रपतींची भेट घेत आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची मागणी केली आहे. मुख्य म्हणजे, इराणचे राष्ट्रपती हसन रोहानी यांनीही जेनाबची मागणी मान्य केली आहे. जेनाब म्हणाली, “मिस्टर रोहानी जेव्हा माझ्या वडिलांच्या सहकाऱ्यांची हत्या होत असे तेव्हा माझे वडिल त्यांच्या हत्येचा बदला घ्यायचे. आता माझ्या वडिलांची हत्या झाली आहे. त्यांचा बदला कोण घेणार?” यानंतर रोहानी यांनी जे उत्तर दिलं ते सर्व जगाची चिंता वाढवणारं आहे.

कारण हसन रोहानी यांनी जेनाबची मागणी मान्य केली. रोहानी म्हणाले, “शहिदाच्या हत्येचा बदला नक्कीच घेतला जाईल. काळजी करू नको.” त्यांनी मागणी मान्य करणं म्हणजे थेट अमेरिकेविरोधात युद्ध छेडण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे आता एका लेकीच्या मनातली आग तिसऱ्या महायुद्धाचं कारण होणार का ? हे येणारा काळच ठरवेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/