टॉपची अभिनेत्री एंजेलिना जॉली सारखा चेहरा बनविण्याच्या नादात सर्जरी करून विद्रूप केला चेहरा, आता झाली जेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इराणमध्ये कॉस्मेटिक सर्जरीद्वारे अनेकदा आपला चेहरा बदलणारी इंस्टाग्राम सेलिब्रिटी सहर तबार हिला अटक करण्यात आली आहे. सोशल मिडिया स्टार सहरला तेहरान न्यायालयाच्या आदेशानंतर ताब्यात घेण्यात आले जे सांस्कृतिक गुन्हे आणि सामाजिक नैतिक भ्रष्टाचाराची तपासणी करतात.

एंजेलिना जॉली बनने के चक्कर में सर्जरी से बर्बाद किया चेहरा, अब हो गई जेल

इंस्टाग्राम स्टारवर निंदा, हिंसा भडकवणे, अनैतिक पद्धतीने कमाई करणे आणि तरुणांना भ्रष्ट केल्याचे आरोप लावण्यात आले आहे.

ती तेव्हा तेव्हा इंस्टाग्रामवर चर्चेत आली जेव्हा तिने प्लास्टिक सर्जरी केली आणि तीचे अनेक फोटो शेअर केले ज्यात ती एकदम भीतीदायक दिसत आहे. सहरचे इंस्टाग्रामवर 26,800 फॉलोवर्स आहेत. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ खूपच एडिडेट असता जेणे करुन ती हॉलिवूड स्टार एंजेलिना जॉली सारखी दिसेल.

एंजेलिना जॉली बनने के चक्कर में सर्जरी से बर्बाद किया चेहरा, अब हो गई जेल

तिच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये तीचा भीतीदायक चेहरा, पाउटिंग लिप्स आणि लांबलचक नाक दिसत आहे. अनेकदा तिचे फोटो पाहून विश्वास बसत नाही की तो फोटो तीचा असावा. काही फोटोमध्ये ती हिजाब घातलेली दिसून येते. तर काही फोटोमध्ये नाववर बँडेज लावलेले दिसते. असे बँडेज तिच्या नाकावर सर्जरीनंतर लावण्यात आले. कॉस्मेटिक सर्जरी या देशात लोकप्रिय आहे, अनेक लोक वर्षाला ऑपरेशन करत असतात. इराणमध्ये सोशल मिडिया म्हणून फक्त इंस्टाग्रामचाच वापर होतो, फेसबुक, ट्विटरवर येथे बॅन आहे.

एंजेलिना जॉली बनने के चक्कर में सर्जरी से बर्बाद किया चेहरा, अब हो गई जेल

Visit : Policenama.com