ट्रम्पच्या 52 निशाण्यांच्या उत्तरात इराणनं मोजले 140 ठिकाणं, चुकूनही चूक करू नका असं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला की, इराणने अमेरिकन सैन्य किंवा मालमत्तेवर आक्रमण केल्यास अमेरिका ५२ इराणी स्थळांना लक्ष्य करेल. मात्र अमेरिकेच्या या धमकीला इराणनच्या कुडस फोर्सने सडेतोड उत्तर देत म्हंटले कि, त्यांनी अमेरिका आणि त्याच्या मित्र देशातील १४० तळ ओळखले आहेत. त्यामुळे जर क्षेपणास्त्र हल्ल्याला उत्तर देताना अमेरिकेने इराणचे काही नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर ते या सर्व लक्ष्यांना लक्ष्य करेल.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेला उत्तर देण्यासाठी अनेक मार्गांनी क्षेपणास्त्र हल्ल्याची सर्वात कमकुवत पध्दत निवडली गेली. आणखी कठोर आणि मोठी पावले उचलण्याची क्षमता इराणमध्ये आहे. इराणचे संरक्षणमंत्री आमिर हतामी म्हणाले, ‘आम्ही शॉर्ट-रेंज क्षेपणास्त्रांचा वापर केला. अमेरिकेसाठी हा एक अविस्मरणीय धडा असेल, अशी आशा व्यक्त करतो.’

२०१८ मध्ये ज्या अल असाद ठिकाणी ट्रम्प यांनी भेट दिली होती, त्याच ठिकाणी हल्ला :
२००३ मध्ये सद्दाम हुसेनचा पराभव झाल्यानंतर अमेरिकेच्या सैन्याने अल-असाद तळावर आपला तळ कायम ठेवला. इराकमधील हा सर्वात मोठा हवाई तळ आहे. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटकडून आघाडी घेत असलेल्या युनायटेड स्टेट्स आणि आघाडीच्या भागीदार देशांचे एकूण १५०० सैनिक येथे तैनात असतात. येथे नॉर्वेचेही ७० सैनिक तैनात आहेत. २०१८ मध्ये ट्रम्प यांनी आपली पत्नी मेलानियाबरोबर येथे भेट दिली होती.

‘फक्त सैन्य हल्ला पुरेसे नाही. आपल्या शत्रूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुशलतेने कार्य केले पाहिजे. अमेरिका आपला शत्रू आहे आणि आपल्याला शत्रूच्या योजनेबद्दल माहित असले पाहिजे. आम्ही सामर्थ्यशाली शक्तींविरूद्धच्या संघर्षासाठी एक झालो आहोत. इराण कधीही कमकुवत होणार नाही किंवा कधीही हार मानणार नाही. इराणचे काय झाले हे आम्ही कधीही विसरणार नाही, ‘ असे अयातुल्ला खामनेई यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद म्हणाले, मुस्लिम देशांनी संघटित झाले पाहिजे. मलेशियात १०,००० इराणी नागरिक राहत आहेत. इस्लामिक देशांना लक्ष्य केले जात आहे आणि असुरक्षितता वाढत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हंटले. ९४ वर्षीय महातीर जगातील सर्वात जुने पंतप्रधान आहेत.

इराणकडून अमेरिकी सैन्यदलावर क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती : इराकी पंतप्रधान

इराणकडून मिळविलेल्या अधिकृत शाब्दिक संदेशानुसार लवकरच इराकच्या भूमीवर तैनात असलेल्या अमेरिकी सैन्यावर लवकरच क्षेपणास्त्र हल्ला करण्यात येईल, असा दावा इराकच्या पंतप्रधान कार्यालयाने बुधवारी केला. सुलेमानी यांच्या हत्येला उत्तर म्हणून हे पाऊल उचलले जाईल आणि हा हल्ला फक्त अमेरिकन सैन्यापुरताच मर्यादित राहील, असे या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, हा हल्ला कोठे होईल हे सांगण्यात आले नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/