इराणचा पुन्हा अमेरिकन सैन्य तळावर हल्ला, 6 दिवसात दुसरा ‘अटॅक’

समारा (इराक) :   अमेरिका आणि इराणमधील तणाव अजूनही कायम आहे. इराकमधील अमेरिकेच्या सैन्य ठिकाणावर इराणने ४ रॉकेट डागली असून या हल्ल्यात ४ इराकी सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
इराणचे कमांडर कासीम सुलेमानी याच्यावर अमेरिकेने ड्रोनमार्फत हल्ल्ला करुन त्याचा खातमा केला होता. त्यानंतर इराणने इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकेच्या सैनिक ठिकाणावर क्षेपणास्त्र हल्ला केला होता.

लागोपाठ केलेल्या या हल्ल्यात इराणने ८० जण ठार झाल्याचा दावा केला होता. इराणने रविवारी रात्री अल बलाद एअरबेसवर ४ रॉकेट टाकली. या बेसवर अमेरिकन ट्रेनर, एफ १६ लडाऊ विमानांच्या दुरुस्तीशी संबंधित सैनिक राहतात. या हल्ल्यात एअरबेसच्या धावपट्टीचे नुकसान झाले आहे. रॉकेटच्या हल्ल्यात एअरबेसवरील गेटवर असलेले इराकी सैनिक जखमी झाले आहेत.

या एअरबेसवर अमेरिकन सल्लागार, ट्रेनर आणि विशेषज्ञ राहतात. इराणच्या पहिल्या हल्ल्यानंतर येथील अधिकारी आणि सैनिकांना एअरबेसवरुन हटविण्यास सुरुवात झाली होती. हल्ला झाला तेव्हा या बेसवर अमेरिकन सैनिक नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/