दहशतवाद रोखा अन्यथा ….इराणची पाकिस्तानला धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताप्रमाणे इराणही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या कारवायांनी त्रस्त आहे. पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची धमकी इराणने पाकिस्तानला दिली आहे. इराणमधील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (आयआरजीसी) कोड्स फोर्सचे जनरल कासीम सोलेमनी यांनी याबाबत एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

पाकिस्तानातून इराणविरोधी दहशतवादी कारवाया चालतात. पाकिस्तान या दहशतवादी गटांना रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलत नसल्यामुळे इराणच्या सरकारने आणि सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

इराणच्या संयमाचा अंत पाहू नये –

दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानचेही इराण सरकार आणि तेथील लष्करानं पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात अपयशी ठरलेले पाकिस्तानचं सरकार आणि लष्करालाही जाब विचारताना जनरल कासीम यांनी म्हंटले आहे की , ‘तुम्ही कोणत्या दिशेला चालला आहात?’ सीमेवर आणि शेजारी देशांमधील अशांततेला तुम्हीच कारणीभूत आहात. तुमच्याकडे अणुबॉम्ब आहे. तरीही तुमच्या देशात कार्यरत दहशतवादी संघटनांचा तुम्ही नायनाट करू शकला नाहीत. ‘पाकिस्ताननं इराणच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशाराही जनरल कासीम यांनी दिला.

पुलवामा हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर दहशतवादाविरुद्ध अनेक राष्ट्रांनी भारताला पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताने दहशतवादाविरुद्ध प्रस्ताव मांडला होता त्याला चीनने पाठिंबा दिला. चीनच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला हादरा बसला आहे. त्यातच इराणने आता पाकिस्तानात घुसून कारवाई करण्याची धमकी दिली आहे.