इराण सरकारचे फर्मान; TV वरील महिला कार्टुन कॅरेक्टरलाही घालावा लागणार बुरखा !

तेहराण : वृत्तसंस्था – इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांनी आज मोठी घोषणा केली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले, की टीव्ही चॅनेलवर दाखवल्या जाणाऱ्या महिला कार्टुन कॅरेक्टरलाही बुरखा घालावा लागणार आहे. इराणच्या राजकीय कार्यकर्त्यांनी या निर्णयावर टीका करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खामेनेईची यांना सध्या भीती वाटते, की या मुली पुढे जाऊन बुरखा घालणार नाहीत. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

इराणच्या राजकीय कार्यकर्त्यांनी सांगितले, की सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा आदेश हा टॉक्सिक आहे. जे लोक सत्तेवर आहेत, ते समजत आहे, की महिलांबाबत काहीही निर्णय देऊ शकतात. इराणचे तन्सिम न्यूज एजन्सीने खामेनेई यांना सवाल विचार म्हटले होते, की सध्या परिकल्पित स्थितींमध्ये बुरखा गरजेचा नसतो. मात्र, बुरखा नाही घातला तर तुमच्यावर परिणाम होऊ शकतो. ते पाहता ऍनिमेशन फिल्ममध्ये असणाऱ्या महिलांनीही बुरखा घालायला हवा.

दरम्यान, इराणी कार्यकर्त्यांना वाटते, की खामेनेई यांना भीती वाटते की कार्टून पाहणाऱ्या मुली जेव्हा मोठ्या होतील तेव्हा त्या बुरखा घालणार नाहीत. त्यामुळे त्यांना आता कार्टुन कॅरेक्टरलाही बुरखा घालण्याचे फर्मान काढले आहे.

कोणाकडून समर्थन तर कोणाकडून टीका
इराणी पत्रकार मसीह अलीनेजाद यांनी खामेनेई यांच्या निर्णयानंतर सांगितले, की इराणच्या सर्वोच्च नेत्याने घोषणा केली, की एनिमेशन फिल्ममध्येही महिलांना बुरखा घालावा, हा काही विनोद नाही. तर दुसरीकडे इराणी अकेडमिक अरश अजीजी यांनी या निर्णयावर टीका करत ते म्हणाले, ही मूर्खता आहे. माझ्या आकलनापलीकडचं आहे.