जगभरातून विरोध झाला तरी देखील ‘या’ देशातील एका कुस्तीपट्टूला देण्यात आली फाशी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इराणी कुस्तीपटू नवीद अफकारी याला फाशी देण्यात आली. 2018 मध्ये सरकारविरोधी निदर्शनांमध्ये भाग घेतला असताना सुरक्षा रक्षकाची हत्या केल्याचा आरोप नाविद अफकारीवर होता, ज्यामध्ये त्याला दोषी ठरविण्यात आले आणि शनिवारी त्याला फाशी देण्यात आली. इराणी सरकारने अफकारीला सुनावण्यात आलेल्या शिक्षेला जगभरातून विरोध दर्शविण्यात आला तरीदेखील इराण सरकारने त्याला फाशी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
इराणच्या दक्षिणेकडील पर्सियाच्या न्याय विभागाचे प्रमुख काझिम मौसवी यांचा हवाला देत नाविदला पीडित कुटुंबाच्या इच्छेनुसार कायदेशीररित्या मृत्यूदंड ठोठावण्यात आला. अफकारीवर हसन तुर्कमनची हत्या केल्याचा आरोप होता, जो वॉटर कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचा. हसनवर खुनासह इतरही खटले चालू होते आणि ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली.
ग्रीको रोमन कुस्तीपटू होता अफकारी
नाविद अफकारी (वय 27) हा ग्रीको-रोमन कुस्तीपटू होता. या गुन्ह्याची कबुली देण्यासाठी त्याच्यावर जबरदस्तीने छळ करण्यात आला, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्याला कबूल करण्यास भाग पाडले गेले, अन्यथा त्याच्याविरूद्ध पुरावा मिळालेला नाही, असेही त्याच्या वकिलाने सांगितले. मात्र, कोर्टाने त्याच्या वकिलाची प्रत्येक याचिका फेटाळली. कायदेशीररीत्या आवश्यक असणार्या अफकारीला फाशी देण्यापूर्वी आपल्या कुटूंबियांना भेटू दिलं गेलं नाही, असा आरोपही त्याच्या वकिलाने केला आहे.
सगळीकडून होत होता शिक्षेस विरोध, परंतु इराण सरकारने ऐकलं नाही
नवीद अफकारीच्या शिक्षेचा निषेध म्हणून, 85,000 ऍथलिट्सचे नेतृत्व करणार्या जागतिक संघटनेने इराणकडून होणारी शिक्षा रोखण्याचा प्रयत्न केला होता आणि असे केल्यामुळे क्रीडा जगात इराणवर बहिष्कार टाकला जाईल, असे ते म्हणाले. असे असूनही अफकारीला फाशी देण्यात आली. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही अफकारीची शिक्षा थांबविण्याचे आवाहन केले,मात्र त्याकडे इराणने दुर्लक्ष केले.
सरकारविरोधी निषेधात सहभागी झाल्यामुळे नाविद अफारकीला शिक्षा
2018 मध्ये, घसरणारी अर्थव्यवस्था आणि सरकारच्या कठोर धोरणांविरूद्ध इराणमध्ये तीव्र निषेध नोंदवले गेले. या निषेधांमध्ये अफारकारीही सहभागी होता. इराणने यासाठी इस्राईल आणि अमेरिकेला दोष दिले. असे मानले जाते की या निषेधात भाग घेतल्याबद्दल अफकरीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तथापि, गेल्या महिन्यात इराणी वाहिनीवर अफकारीचा एक व्हिडिओ दाखवला गेला होता, ज्यामध्ये तो आपल्या गुन्ह्यांची कबुली देताना दिसला. या दरम्यान त्यांचे लेखी निवेदनही दर्शविण्यात आले. तथापि, मानवाधिकार संघटनांनी हा सरकारचा प्रोपेगेंडा असल्याचं सांगत ते नाकारलं.