इराणचा अमेरिकी सैन्याच्या तळावर दुसरा ‘हल्ला’, डझनभराहून अधिक मिसईलचा ‘मारा’, युद्ध भडकण्याची ‘चिन्ह’

बगदाद : पोलीसनामा ऑनलाइन – इराणचे कमांडर कासीम सुलेमानी यांची हत्या करण्यासाठी ज्या अमेरिकेने ज्या एअरबेसचा वापर केला. त्यावर इराणने डझनाहून अधिक क्षेपणास्त्रांचा हल्ला चढवला आहे. अमेरिका आता या हल्ल्यावर प्रतिउत्तर देण्याची शक्यता असून त्यामुळे आता अमेरिका आणि इराण यांच्यात थेट युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेच्या पेंटागनने याची पृष्टी केली आहे. पेंटागनने ट्विट  करुन सांगितले की, इराणने ७ जानेवारीला अमेरिकी सेना आणि संयुक्त राष्ट्र सेना यांच्या एअरबेसवर एक डझनहून अधिक बॅलिस्टिक मिसाईल डागली आहेत. हे इराणचेच काम आहे.

अमेरिकन सैनिक इराकमधील अल असद आणि इरबिल या एअरबेसचा वापर करते. इराणचे कमांडर कासीम सुलेमानी यांची हत्या करण्यासाठी अमेरिकेने याच एअरबेसचा वापर केला होता. इराकच्या स्थानिक वेळेनुसार मंगळवारी रात्री साडेसात वाजता इराणने हा हल्ला केला असल्याचे अमेरिकेच्या पेंटागनच्या वतीने बुधवारी सकाळी टिष्ट्वट करुन जाहीर केले आहे.

या हल्ल्यामुळे काही नुकसान झाले का याची मात्र काहीही माहिती देण्यात आली नाही.
इराण व अमेरिकेदरम्यान सुरु झालेल्या या संघर्षामुळे संपूर्ण पश्चिम आशियात तणाव निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम खनिज तेलाच्या पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या दररोज इंधनाच्या दरात वाढ होताना दिसत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/