इराकच्या लष्करी तळावर इराणचा पुन्हा ‘रॉकेट’ हल्ला

बगदाद : पोलीसनामा ऑनलाइन – इराणने आजही इराकच्या लष्करी तळावर पुन्हा एकदा रॉकेट हल्ला केला आहे. इराणकडून मंगळवारी रात्री पुन्हा एकदा इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर हा रॉकेट हल्ला केला आहे. इराणचा कमांडर कासीम सुलेमानी याच्यावर ड्रोन हल्ला करुन त्याला ठार केल्यानंतर इराणने इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला करण्याची ही तिसरी वेळ आहे.

इराणने याअगोदर अल बलाद एअरबेसवर दोन डझनहून अधिक रॉकेटचा हल्ला केला होता. त्यात ८० जण ठार झाल्याचा दावा इराणने केला होता. त्यानंतर केलेल्या एका हल्ल्यात विमानतळावरील गेटवर गस्त घालणारे चार इराकी सैनिक जखमी झाले होते.

तसेच इराणमधील अमेरिकन दुतावासाजवळही इराणने रॉकेट हल्ला केला होता. आता केलेल्या हल्ल्याबाबत अजून कोणतीही माहिती इराक अथवा इराणने जाहीर केलेली नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like