Corona Virus : इराणच्या उपराष्ट्रपतींनाही ‘कोरोना’ची लागण, WHO नं दिले नियंत्रणाचे ‘संकेत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीन मधील कोरोना व्हयरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे . इराण च्या उपराष्ट्रपती मसूहर इब्तेकर यांना जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण झाली आहे . संक्रमित रुग्णांची संख्या २४५ वर पोहचली आहे तर २६ लोकांचा मृत्यू झाला आहे .

कोरोना व्हायरसच्या संसर्गमुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. ४० हुन अधिक देशांनी हायअलर्ट घोषित केला आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत २८०२ लोकांना जीव गमवावा लागला. ८२०६९ लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे. चीननंतर दक्षिण कोरिया आणि आता इराण मध्ये हि संसर्ग झाला आहे.

त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) ने महामारी नियंत्रणात आले असल्याचा संकेत दिला आहे. कोरोना व्हायरस मुळे प्रभावित असलेल्या देशांनी लवकरच त्याला निपटण्यासाठी उपाययोजना करावी, असे केल्यास लागण झालेल्याना वाचवता येईल असे WHO चे प्रमुख टैड्रास अ‍ॅडनॉम गैबरेयेसस यांनी सांगितले आहे .

चीनमध्ये एका गर्भवती महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे गर्भातच बाळाला कोरोनाचा संसर्ग झाला. विशेष म्हणजे १७ दिवसाच्या बाळाने कोणतेही ओषध ना घेता कोरोना व्हायरस वर मात केली आहे. १७ दिवसाच्या बाळामध्ये कोरोना व्हायरस नसून आता त्याचा शरीरं उत्तम असल्याचा समजत आहे. त्याचा बरोबर त्या बाळाचे नाव सीओ सीओ (Xiao Xiao) असं आहे .