‘आंदोलनकर्त्यांनी’ पोलिसांवर सोडला ‘बब्बर शेर’, ‘श्वान’ घेऊन आलेल्या पोलिसांनी काढला ‘पळ’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – इराकमध्ये सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. लोक भ्रष्टाचार, नोकरी आणि सार्वजनिक सेवामध्ये सरकारच्या बेजबाबदारपणामुळे नाराज आहेत. त्यामुळे नाराज जनतेकडून आंदोलन करण्यात येत आहे. या दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर श्वान सोडले. परंतू पोलिसांपासून आणि कुत्र्यांपासून सुटकारा मिळवण्यासाठी नवी पद्धत शोधली आहे. एका आंदोनकर्त्यांने या विरोध प्रदर्शनात बब्बर शेर म्हणजेच सिंहीण आणली. या सिंहीणीला पाहून पोलीस कर्मचारी आणि त्यांंचे श्वास आंदोलनाच्या ठिकाणाहून पाळाले.

या सिंहीणीच्या गळ्यात साखळी बांधली होती. या सिंहिणीला घेऊन आलेला आंदोलनकर्ता थेट पोलीस कर्मचाऱ्यांच्या दिशेने पळू लागला. सिंहीण पाहून श्वान देखील पोलीस कर्मचाऱ्यांकडे पळाले.

पोलिसांना आणि कुत्र्यांना पळवल्यानंतर सिंहीण आजूबाजूला असलेल्या लोकांकडे पळाली. यानंतर ही सिंहीण रस्त्याच्या कडेला आराम करताना दिसली. सिंहीणला घेऊन आलेला आंदोलनकर्ता त्या सिंहीणीबरोबर बसला होता.

या आंदोलनकर्त्यांने पोलिसांनी कुत्रे आणल्याने सिंहीण आणली होती. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे. आतापर्यंत इराकमध्ये आंदोलनामध्ये 320 लोकांचा मृत्यू झाला आहे. आंदोलनकर्ते आणि सुरक्षा दलात कायमच संघर्ष पाहिला मिळत आहे.

14 नोव्हेंबर 2019 ला आंदोलनकर्ते आणि सुरक्षा दलात झालेल्या संघर्षात 65 लोक जखमी झाले होते. या दिवशी 4 लोकांचा मृत्यू झाला. इराकची बुडती अर्थव्यवस्था आणि रोजगारचे संकट या कारणाने लोक रस्त्यावर धरणा आंदोलन करत आहे. पंतप्रधान अब्दुल मेहदीने गरीब आणि बेरोजगारांसाठी विविध घोषणा केल्या. जेणेकरुन आंदोलनकर्ते शांत होतील, परंतू आता पर्यंत सरकार आंदोलनकर्त्यांना शांत करु शकले नाही.

सुरक्षा दलांकडून आंदोलनकर्त्यांना पसरवण्यासाठी गोळीबार देखील केला. अश्रू धरांचा मारा देखील करण्यात आला. रबर बुलेट्सचा वापर करण्यात आला. अशा विविध प्रकारे आंदोलकांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू आंदोलनकर्ते शांत झाले नाहीत. हिंसाचे वाढते प्रमाण पाहता इराक सरकारने बगदादसह अन्य शहरात कर्फ्यु लावण्यात आला आहे आणि इंटरनेट सेवा बंद केली आहे. इराकमधील लोक राजकीय पक्षांना जबाबदार मानत आहेत. असे मानले जात आहे की 2003 मध्ये इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसैन यांच्या पतनानंतर देशात बेरोजगारी आणि आर्थिक तंगी सारख्या समस्या वाढल्या आहेत.

Visit : Policenama.com