IRCTC Agent | सुवर्णसंधी ! फक्त 3,999 देऊन तुम्ही सुद्धा बनू शकता IRCTC एजंट, दरमहा होईल 80000 पर्यंत कमाई, जाणून घ्या कशी?

नवी दिल्ली : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनचे (IRCTC) एजंट (IRCTC Agent) होऊन तुम्ही चांगली कमाई करू शकता. यात तुमची पोझिशन रेल्वे ट्रॅव्हल सर्व्हिस एजंट (Railway Travell Service Agent) ची असेल. याबाबत सर्व जाणून घेवूयात…
इतके मिळते कमीशन
रेल्वेच्या बुक करण्यात आलेल्या एकुण आरक्षित तिकिटांपैकी 55% तिकिटे ऑनलाइन बुक केली जातात. आयआरसीटीसीचे अधिकृत एजंट अमर्याद ई-तिकिट बुक करू शकतात. एजंटला ट्रेन तिकिट बुक करण्याच्या बदल्यात कमीशन मिळते. रेल्वेने दिलेल्या लॉगइनद्वारे एजंट तिकिट बुक करतात.
अधिकृत एजंटला एसी क्लास (Non- AC Class) साठी 20 रुपये प्रति PNR आणि एसी क्लास (AC Class) मध्ये 40 रुपये प्रति PNR कमीशन मिळते. तसेच, एजंटला 2,000 रुपयांपेक्षा जास्तीच्या मूल्याच्या व्यवहाराकरता रक्कमेच्या 1% सुद्धा मिळतात.
80,000 रुपयांपर्यंत होऊ शकते कमाई
एका महिन्यात किती तिकिट बुक करायची याची एजंटला मर्यादा नाही. एक एजंट प्रति महिना 80,000 रुपयांपर्यंत रेग्युलर इन्कम मिळवू शकतो. जर काम कमी असेल, मंदी असेल तरीही सरासरी 40-50 हजार रु. ची कमाई होऊ शकते.
असे व्हा एजंट
यासाठी 12वी पास असणे आवश्यक आहे. आयरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करा.
आवश्यक कागदपत्र आणि माहिती भरा. बुकिंग एजन्सीसाठी दोन प्लॅन आहेत, पहिल्या प्लॅनसाठी एकवर्षासाठी चार्ज आहे 3,999 रुपये. दूसर्या प्लॅनमध्ये दोन वर्षासाठी एजन्सी चार्ज 6,999 रुपये आहे.
एजंट बनण्यासाठी 30,000 रु चा डीडी आयआरसीटीसीच्या नावाने बनवावा लागेल. जर तुम्ही डील कॅन्सल
केली तर तुम्हाला 20,000 रुपये परत मिळतील. सोबतच दरवर्षीसाठी 5,000 रुपये अॅग्रीमेंट रिन्यूअलचे द्यावे लागतील.